झारखंडमध्ये भाजपा ६८, आजसु १०, जेडीयु २, आणि लोजपा १ जागेवर निवडणूक लढणार!

एनडीएचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला

झारखंडमध्ये भाजपा ६८, आजसु १०, जेडीयु २, आणि लोजपा १ जागेवर निवडणूक लढणार!

झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएमध्ये जागावाटप जाहीर करण्यात आले आहे. शुक्रवारी (१८ ऑक्टोबर) भाजप आणि आजसुने रांची येथील प्रदेश भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेत जागावाटपाची घोषणा केली. झारखंडमध्ये भाजप ६८, आजसु १०, जेडीयु २ आणि लोजपा (रामविलास) १ जागेवर निवडणूक लढवणार आहे.

भाजपने मित्रपक्षांसोबत निवडणुकीसाठी जागावाटपाचा निर्णय घेतला आहे. भाजपचे निवडणूक प्रभारी शिवराज सिंह चौहान आणि सहप्रभारी हिमंता बिस्वा सरमा यांनी रांची येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री आणि झारखंडचे निवडणूक प्रभारी शिवराज सिंह चौहान म्हणाले, “भाजप, आजसु, जेडीयु आणि लोजपा (रामविलास) राज्यात एकत्र निवडणुका लढवणार आहोत. आम्ही एकत्र प्रचारही करणार आहोत. पत्रकार परिषदेत आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा, झारखंड भाजपचे अध्यक्ष बाबुलाल मरांडी, एजेएसयू प्रमुख सुदेश महतो उपस्थित होते.

हे ही वाचा : 

म्हैसूर येथील मुडा कार्यालयावर ईडीचा छापा

बहराइच हत्या प्रकरणातील आरोपी बिर्याणी खाऊन सुटतील…

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात रशियाला जाणार

जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये दहशतवाद्यांकडून एका गैर-स्थानिकाची हत्या!

झारखंडमध्ये दोन टप्प्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. १३ नोव्हेंबरला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यासाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. यानंतर २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सध्या सुमारे २.६ कोटी मतदार आहेत.

Exit mobile version