28 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरविशेषमोदींवरील विश्वासाचं हे यश!

मोदींवरील विश्वासाचं हे यश!

चार राज्यांच्या निकालांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

Google News Follow

Related

विधानसभा निवडणुका झालेल्या चार राज्यांचे निकाल आज लागले.चार राज्यांपैकी तीन राज्यात भाजपने आघाडी घेत विजय मिळविला.निकालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.या विजयाचं श्रेय हे पंतप्रधान मोदी,अमित शाह आणि जे.पी नड्डा यांचं आहे. मोदींवरील विश्वासाचं हे यश असल्याचं यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.हा अभूतपूर्व निकाल असून जनतेच्या मनात काय आहे याची ही नांदी असल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली. दरम्यान आता महाराष्ट्रात देखील भाजपचं सरकार येणार असल्याचा विश्वास देखील देवेंद्र फडणवीसांनी यावेळी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इंडी आघाडीवर टीका करत म्हणाले की, इंडिया आघाडीला जनतेने आता नाकारलं आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या अजेंडाला देखील लोकांनी नाकारलं आहे.इंडी आघाडीच्या लोकांनी कितीही खापर फोडलं तरी देखील जनता ही मोदी यांच्याच पाठीशी आहे मला हे देखील नमूद केलं पाहिजे. हीच परिस्थिती महाराष्ट्रात देखील आहे. महाराष्ट्रामध्ये नुकत्याच ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं दोन तृतीयांश ग्रामपंचायत आणि लोकसभेमध्ये देखील तेच आपल्याला पाहायला मिळालं, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं.

ते पुढे म्हणाले की, तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला अभूतपूर्व अशा प्रकारचे यश प्राप्त झालं आहे. हे यश जनतेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरचा विश्वास आहे. नरेंद्र मोदी यांनी पारदर्शीपणे प्रामाणिकपणे गरीब कल्याणाचा अजेंडा चालवला, ज्या प्रकारे नरेंद्र मोदी यांनी देशाला विकासाच्या मार्गावर नेलं, ज्या प्रकारे नरेंद्र मोदी यांनी सामान्य माणसाच्या मनामध्ये हे बिंबवलं आहे की सरकार त्यांच्या करता काम करत आहे आणि त्याचं प्रत्यंतर ज्या प्रकारे लोकांना त्या ठिकाणी पाहायला मिळालं, हा त्याचा खर म्हणजे विजय आहे. म्हणून या सर्व राज्यांमधल्या जनतेचे तर आभार मानतोच पण खऱ्या अर्थाने या विजयाचे श्रेय हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आहे, मोदी यांच्या नावाचं, त्यांच्या करिष्म्याचं आहे.

हे ही वाचा:

विधानसभेचे निकाल श्री गांधी-राऊत कृपेकरून

हवाई दलाला मिळाल्या १५३ अग्निवीरवायू महिला

नेदरलँड्सचे ट्रम्प

आता मन मन मे मोदी…

त्यासोबत आमचे माननीय राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि आमचे मास्टर स्ट्रॅटेजिस्ट अमित शाह यांच्यासोबत त्या त्या राज्यातली जी काही भाजपची टीम आहे आणि आमची राष्ट्रीय टीम आहे या सगळ्यांचं हे श्रेय आहे. म्हणून या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो.खरं म्हणजे आपण बघितलं तर भारतीय जनता पक्षाची मतं ही दहा टक्के पेक्षा देखील जास्त वाढलेली आहेत. विशेषता छत्तीसगडमध्ये जवळपास १४ टक्के मतं वाढली. राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली, मध्य प्रदेश मध्ये आठ टक्क्याने मतं वाढली. तेलंगाना मध्ये देखील जवळपास दहा टक्क्यांनी मत वाढलेली आहेत. त्यामुळे एकूणच सगळीकडे मोठ्या प्रमाणात जनतेचा विश्वास हा भारतीय जनता पक्षावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो.

आपण जर आताचे कल बघितले तर साधारणपणे ६३९ पैकी ३३९ जागा भारतीय जनता पार्टी जिंकतेय. म्हणजे ५० टक्के पेक्षा जास्त जागा या चारही राज्यांमध्ये मिळून या भारतीय जनता पक्षाला मिळतात. हा निकाल एक प्रकारे जनतेच्या मनामध्ये काय आहे, याची नांदी आहे.तसेच जो विकास आणि विश्वास नरेंद्र मोदी यांनी तयार केला आहे, डबल इंजिन सरकारने तयार केला आहे, त्याच्या आधारावर मला विश्वास आहे पुन्हा एकदा महाराष्ट्रात आणि देशात भारतीय जनताच पाहायला मिळेल, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा