भाजपा साजरा करणार ऑनलाईन विजयोत्सव

भाजपा साजरा करणार ऑनलाईन विजयोत्सव

संपूर्ण देशात कोविडच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. देशात रोजच्या रोज लक्षावधी लोक बाधित होत आहेत. त्यामुळे ज्या पाच राज्यांत निवडणुका झाल्या आहेत, त्या राज्यांत दोन मे रोजी निकालानंतर निवडणुक आयोगाने रॅली काढण्यास बंदी घातली आहे.

देशातील कोविडचा वाढता प्रभाव लक्षात घेता निवडणुक आयोगाने दोन मे रोजी निकाल लागल्यानंतर एकत्र येऊन जल्लोष करायला, उत्सव साजरा करायला बंदी घातली आहे. भाजपाचे सचिव तरूण चुघ यांनी एएनआय वृत्त संस्थेशी बोलताना माहिती दिली, की भाजपा या निवडणुकीत जिंकेलच याची खात्री आहे. त्यामुळे एक जबाबदार पक्ष म्हणून हा दिवस साजरा करू, परंतू तो निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या सर्व मर्यादांमध्ये राहून साजरा करू. आम्ही कोविड-१९ च्या निर्बंधांचे पालन या पाच राज्यांच्या निवडणुकांमधील प्रचारादरम्यात देखील केले होते. आता विजयानंतर हा विजय सर्व कार्यकर्त्यांसोबत ऑनलाईन पद्धतीने साजरा केला जाईल.

हे ही वाचा:

संजय राऊत म्हणतात, पंतप्रधान मोदींची बदनामी सहन करणार नाही

लसीकरणासाठी मुंबई महापालिकेची आर्थिक मदत घ्या, राहुल शेवाळेंचा ठाकरे सरकारला घरचा आहेर

…आणि चिदंबरम यांच्यावर लोक चिडले!

गडकरींमुळे महाराष्ट्रातून विकासाचा ‘मार्ग

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी देखील ट्वीट करून भाजपा या निर्बंधांचे स्वागत करत असल्याचे स्पष्ट केले आहे. या वेळी त्यांनी मी स्वतः सर्व राज्यातील भाजपा प्रदेशांना या निर्बंधांचे कडक पालन करण्याचे आदेश दिले आहेत. आमचे कार्यकर्ते या संकटकाळात सामान्य नागरीकांच्या सेवेसाठी पूर्ण ताकदीने उभा आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

त्याबरोबरच त्यांनी भाजपाची सर्व प्रदेश कार्यालये या कोविड निर्बंधांचे बिनचूक पालन करेल. जे पी नड्डा यांनी यावेळी सर्व देशवासीयांनी आरोग्याशी संबंधीत सर्व निर्बंधांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

सध्या देशातील कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. त्यात निवडणुका घेतल्या गेल्याने काही दिवसांपूर्वीच मद्रास उच्च न्यायालयाने निवडणुक आयोगाला फटकारले होते.

Exit mobile version