भाजप ओडिशात नवीन पटनायक यांचे २५ वर्षांचे सरकार उलथवून सत्ता स्थापन करण्यासाठी सज्ज झाले आहे. १४७ मतदारसंघांच्या ओडिशा राज्यात भाजपने तब्बल ७८ जागांवर विजय मिळवला असून बिजू जनता दलाला अवघ्या ५१ जागांवर रोखले आहे.
काँग्रेस पक्षही १४ जागा जिंकून राज्यात तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. त्यामुळे इतिहासात पहिल्यांदाज भाजप ओडिशात सत्तास्थापनेसाठी सज्ज झाले आहे. तसेच, बिजू जनता दलाचे २५ वर्षांचे सरकार भाजपने उलथवून टाकले आहे.
ओडिशात १३ मे, २० मे, २५ मे आणि १ जून रोजी विधानसभेच्या निवडणुका झाल्या. लोकसभा निवडणुकीसोबतच राज्यात विधानसभेच्या निवडणुकाही घेण्यात आल्या होत्या. सन २०१९च्या विधानसभा निवडणुकीत ११२ जागा जिंकून बिजेडी सर्वांत मोठा पक्ष ठरला होता. तेव्हा भाजप २३ जागा मिळवून दुसऱ्या क्रमांकाचा तर काँग्रेस नऊ जागा मिळवून तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता.
हे ही वाचा:
भाजपला आत्मचिंतन करायला लावणारे निकाल!
‘चांगल्या कामासाठी हार्दिक शुभेच्छा’
बीआरएसची पराभवाची मालिका सुरूच!
उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेशातील अंदाज चुकले
भाजपने सर्व १४७ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. तर, भाजपने मनमोहन समल यांच्या नेतृत्वाखाली सर्व १४७ जागांवर लढत दिली. सरत पट्टनायक यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने १४५ जागा लढवल्या होत्या.ओडिशात भाजप आणि बीजेडी या माजी मित्रपक्षांसोबत कडवी राजकीय मोहीम पाहायला मिळाली. या दोन्ही पक्षांनी एकमेकांवर टीकास्त्र सोडण्याची एकही संधी गमावली नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने नवीन पटनायक यांच्या बिघडलेल्या प्रकृतीला लक्ष्य केले. त्यांचे सहकारी व्हीके पांडियन हे बिगर-ओडिया नसल्यावर जोर देत ओडिया अभिमानाचा मुद्दा उपस्थित केला.
दुसरीकडे, बीजेडीने नवीन पटनायक सरकारच्या कल्याणकारी कामे आणि योजनांभोवती आपला प्रचार केला.