साडेतीन कोटी खर्च केल्याचा आरोप हास्यास्पद!

संजय राऊत यांनी मकाऊ कसिनोमधील व्हायरल केलेल्या फोटोवर बावनकुळेंच स्पष्टीकरण

साडेतीन कोटी खर्च केल्याचा आरोप हास्यास्पद!

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचा मकाऊ कसिनोमधील एक फोटो शेअर करत बावनकुळे यांनी कसिनोमध्ये तीन तासात तीन कोटी उधळल्याचा आरोपही केला होता.यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.ते म्हणाले, माझ्या परिवारासोबत मी हाँगकाँगला गेलो, पण त्या ठिकाणी प्रत्येक हॉटेलमध्ये कसिनो आहेत, त्याला क्रॉस करून जात असताना कोणीतरी माझा फोटो काढला असल्याचं बावनकुळे म्हणाले आहेत.तसेच एका फोटोमुळे जर कुणाची इमेज खराब करता येते असं जर एखाद्याला वाटत असेल तर ते शक्य नसल्याचेही बावनकुळे म्हणालेत.

मागील काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी ट्विट करत चंद्रशेखर बावनकुळे यांचा मकाऊ कसिनोमधील फोटो शेअर केला होता.तसेच बावनकुळे यांनी कसिनोमध्ये तीन तासात तीन कोटी उधळल्याचा आरोपही केला होता.यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, अशा कुठल्या फोटोच्या आधारावर कोणाचीही प्रतिमा खराब करत येत नाही.मोठा संघर्ष करून आम्ही इथेपर्यंत पोचलो आहे.यामुळे परिवाराला ज्या पद्धतीने त्रास द्यायचा प्रयत्न झाला तो चुकीचा आहे. मी महिन्याभरातून एकदाच घरी जातोय. त्यावेळी माझ्या कुटुंबाने तीन दिवसांचा वेळ मागितला आणि आम्ही हाँगकाँगला गेलो. त्या ठिकाणी कोणत्याही हॉटेलमध्ये गेला तरी कसिनो आहेतच.तुम्हाला जेवणासाठी अथवा तुमच्या रूमपर्यंत जाण्यासाठी त्याला क्रॉस करूनच जावं लागत.त्याचवेळी मी जात असताना माझा कोणीतरी हा फोटो काढला आणि मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, असे बावनकुळे म्हणाले.

हे ही वाचा:

आयसीसीकडून बंदी; ट्रान्सजेंडर क्रिकेटपटू मॅकगेहे यांची निवृत्ती!

अंतिम सामन्यातील पराभवाच्या कामगिरीत काही कर्णधारांचे सातत्य

सर्पदंशाने मृत्यू झालेल्या युवकाला जिवंत करण्याचा दावा; मृतदेहाच्या बाजूला तासन् तास झोपला मांत्रिक!

मनसेचे पुन्हा खळखट्याक!

चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले की, त्या फोटोवरून आपल्याला आणि आपल्या परिवाराला, व्यक्तिगत जीवनामध्ये बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला, राजकीयदृष्ट्या बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. दुसरीगोष्ट म्हणजे साडे तीन कोटी रुपये परदेशात नेता येत नाहीत. एक लाख रुपये नेले तरीही तीन तीन वेळा चेकिंग केली जाते. माझे तिकडे कुणीही मित्र नाहीत, किंवा हाँगकाँगमध्ये माझा पैसाही नाही. त्यामुळे इतके पैसे मी खर्च करण्याचा प्रश्नच येत नाही. तसेच ज्यांना पैशाच्या या पळवाटा माहिती आहेत त्यांनीच हे आरोप केले आहेत,असे बावनकुळे म्हणाले.

 

Exit mobile version