सनातन धर्माचा अपमान करण्याच्या घटना गेल्या काही दिवसात घडल्या आहेत. विशेषतः द्रविड मुन्येत्र कळघम (डीएमके) पक्षाच्या नेत्यांनी सनातन धर्मावर आक्षेपार्ह टिप्पणी केली. त्यानंतर या नेत्यांवर टीकाही झाली. आता तामिळनाडूचे भाजपा प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी डीएमकेवर बोचरी टीका केली आहे.
अण्णामलाई हे आपल्या अशा टोकदार टीकेबद्दल ओळखले जातात. त्यांनी सनातन धर्मावर खालच्या भाषेत टीका करणाऱ्या उदयनिधी स्टॅलिन आणि ए. राजा यांना त्याच भाषेत उत्तर दिले आहे. उदयनिधी यांनी मागे आपल्या भाषणात बोलताना मलेरिया, डेंग्युला नष्ट करावे लागते तसेच सनातन धर्माला नष्ट करावे लागेल, असे वादग्रस्त विधान केले होते. त्यावर अण्णामलाई यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा:
मोबाईल न दिल्यानं तरुणाची हत्या !
शाहरूखच्या ‘जवान’ चित्रपटामुळे चाहत्यांमध्ये जल्लोष
सुधीर मोरे आत्महत्या प्रकरणी माजी आमदारांच्या मुलीला अटक
नव्या तंत्रज्ञानासह जपानचे चांद्रयान अवकाशात झेपावले
अण्णामलाई यांनी एक्सवर डीएमके पक्षाला लक्ष्य केले आहे. डीएमके मध्ये डी म्हणजे डेंग्यू, एम. म्हणजे मलेरिया आणि के म्हणजे कोसू असे त्यांनी म्हटले आहे. कोसू म्हणजे तामिळी भाषेत डास. अण्णामलाई यांनी लिहिले आहे की, जर तामिळनाडूतून एखादी गोष्ट काढून टाकायची असेल तर ती म्हणजे डीएमके पार्टी. मला खात्री आहे की, जे लोक या पक्षाशी जोडले जातात त्यांना असा रोग होतो.
उदयनिधी यांनी म्हटले होते. सनातन धर्माला विरोध नको तर तो नष्टच केला पाहिजे. पण नंतर उदयनिधी यांनी सारवासारव करताना म्हटले की, सनातन धर्माचे जे पालन करतात त्यांच्यावर हल्ला करण्याच कोणतेही आश्वासन मी दिलेले नाही. एमके. स्टॅलिन यांच्या वक्तव्यावर अण्णामलाई म्हणाले की, आम्ही तुमची आणि तुमच्या पुत्राची वक्तव्ये पाहिली. हे चांगले आहे की, तुम्ही हा वाद शमविण्याचा प्रयत्न केलात कारण तुम्हाला हे ठाऊक आहे की, तुम्ही हरलेले युद्ध खेळत आहात. एम.के. स्टॅलिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल मत व्यक्त केले होते. उदयनिधी काय बोलला हे माहीत असल्याशिवाय, पंतप्रधानांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. त्यावर अण्णामलाई म्हणाले की, पंतप्रधान मोदींबद्दल त्यांना काही गैरसम आहेत.