राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोनासंबंधीचे नवीन नियम जाहीर झाल्यानंतर हा तर मागील दाराने आणलेला लॉकडाऊन आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी व्यक्त केली आहे. आम्ही जनतेसोबत आहोत परंतु राज्यसरकारच्या उपाययोजनांना आमचा पाठींबा आहे अशी भावना भातखळकर यांनी व्यक्त केली. परंतु सरकारने उपाययोजना करताना सर्वसामान्य जनतेचा विचार करावा. सरकारने आपल्या अपयशाचे खापर जनतेवर फोडू नये आणि गरिबांच्या बँक खात्यांमध्ये पाच हजार जमा करावे अशी मागणीही त्यांनी केली आहे.
राज्यात कोरोनाचे प्रमाण अफाट वाढले आहे. २ दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून याविषयी चिंता व्यक्त केली आणि त्या फेसबुक लाईव्ह मध्ये लॉकडाऊन जाहीर होईल अशी शक्यता व्यक्त केली होती. एक दोन दिवसात या संबंधीची नियमावली जाहीर होईल असे सूतोवाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते, त्यानुसार आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवे नियम जाहीर झाले आहेत आणि हे नियम जाहीर झाल्यानंतर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी आपली भूमिका मांडली आहे.
हे ही वाचा:
राज्यात ‘विकेंड’ लॉकडाऊन, काय आहेत नवे नियम?
कोळसा घोटाळ्यात ममतांचे हात काळे
मुंबईत लॉकडाऊन लावण्याची शक्यता नाही- किशोरी पेडणेकर
मुख्यमंत्र्यांनी केली देवेंद्र फडणवीस, राज ठाकरेंशी चर्चा
“मंत्रिमंडळाने आज कोरोनाच्या संदर्भात घेतलेले निर्यण हे म्हणजे मागच्या दाराने लॉकडाऊन आणण्याचाच प्रयत्न आहे. राज्यातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे सरकार हे निर्णय घेत आहे आणि भारतीय जनता पार्टी याविषयामध्ये राज्यसरकारच्या उपाययोजनांना पाठींबा देत आहे परंतु या सगळ्याचे खापर सरकार आणि मुख्यमंत्री हे वारंवार जनतेवर फोडत आहेत. सरकारने जनतेवर हे खापर फोडू नये आणि या सगळ्याची जबाबदारी सरकारने स्विकारली पाहिजे आणि निर्बंधाच्या नावाखाली लॉकडाऊन आणत असताना सर्वसामान्यांचा रोजगार बुडतोय, त्यांची आर्थिक चिंता वाढतेय आणि सरकारने आर्थिक मदत त्यांना केली पाहिजे. पाच पाच हजार रुपये लोकांच्या खात्यामध्ये जमा केले पाहिजेत अशी आमची मागणी आहे आणि त्याचबरोबर नेत्यांना राजकारण करण्यापासून थांबवा आणि केंद्रातल्या सरकारवर आणि राज्यातल्या विरोधी पक्षावर टीका करणं बंद करा असे मुख्यमंत्रांना आमचे सांगणे आहे. आताची बिकट परिस्तिथी तुमच्या नाकर्तेपणामुळे आली असली तरी भारतीय जनता पार्टी जनतेच्या आणि सरकारच्या पाठीशी उभी आहे”, असे मत भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी मांडले आहे.
ठाकरे सरकारने मागील दाराने लॉकडाउन आणलाच… pic.twitter.com/A76iQAw8vh
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 4, 2021