पश्चिम बंगालमध्येही भाजप उमेदवाराची नग्न धिंड काढली होती, त्याचे काय?

भाजपा प्रवक्त्या लॉकेट चॅटर्जी यांनी रडत विचारला सवाल

पश्चिम बंगालमध्येही भाजप उमेदवाराची नग्न धिंड काढली होती, त्याचे काय?

एकीकडे मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढून त्यांच्यावर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडलेली असताना पश्चिम बंगालमध्ये अशाच प्रकारच्या घटनेकडे मात्र दुर्लक्ष केले गेल्याबद्दल भाजपाच्या प्रवक्त्या लॉकेट चॅटर्जी यांनी संताप व्यक्त केला आणि तो व्यक्त करताना त्या पत्रकार परिषदेतच हमसून रडू लागल्या.

 

 

बंगालमध्ये झालेल्या पंचायत निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या महिला उमेदवारावर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला. तिचे कपडे फाडण्यात आले आणि तिचीही नग्न धिंड काढण्यात आली. हावडा येथे ही घटना घडली.

पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या की, आम्हीही महिला आहोत. आमच्या मुलींचेही संरक्षण व्हावे असे आम्हाला वाटते. आम्हीही देशाच्या मुली आहोत. मणिपूरमध्ये ज्या मुली पीडित आहेत त्याही देशाच्या मुली आहेत. आपल्या अश्रुंना वाट मोकळी करून देताना त्या म्हणाल्या की, पश्चिम बंगाल हा भारताबाहेरचा प्रदेश नाही. मणिपूरमधील महिलांबद्दल बोलताना आमच्या प्रदेशातील महिलांबद्दलही बोलले गेले पाहिजे. आमच्या ग्राम सभा उमेदवारावर असाच हल्ला झाला होता.

हे ही वाचा:

ऑटोरिक्षा, टॅक्सी चालकाने भाडे नाकारल्यास करा व्हॉट्सऍपवर तक्रार

दरड प्रवण क्षेत्रातील लोकांचे स्थलांतर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

अनध‍िकृत शाळांबाबत एसआयटी मार्फत चौकशी करा

मुस्लिमांची संख्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत १४.२ टक्के; अर्थात २० कोटी

 

एएनआयच्या बातमीनुसार ८ जुलैला ही घटना घडली. हावडा जिल्ह्यातील दक्षिण पंचला या भागात हा प्रकार झाला. तृणमूलचा ग्राम सभा उमेदवार हेमंता रॉय यांच्याकडून हा हल्ला करण्यात आला. त्या महिला उमेदवाराने सांगितले होते की, त्या तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी माझ्या छातीवर मारले आणि नंतर काठीने मारत मला मतदान केंद्रातून बाहेर काढले. या तृणमूलच्या उमेदवाराने माझे कपडे फाडण्यासाठी प्रवृत्त केले. त्यांनी तसे करून मला आजूबाजूच्या लोकांसमोर मला नग्न केले.

Exit mobile version