23.4 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषभाजपाचे तिकीट नाही, पण वरुण गांधी प्रचारात भाग घेतील!

भाजपाचे तिकीट नाही, पण वरुण गांधी प्रचारात भाग घेतील!

मेनका गांधी यांचे मत

Google News Follow

Related

भारतीय जनता पार्टीचे खासदार वरूण गांधी यांची उमेदवारी डावलल्यानंतर त्यांची आई मेनका गांधी यांनी मोठा खुलासा केला आहे. त्या म्हणाल्या की, पिलभीत मधून वरून गांधी यांना उमेदवारी द्यायला हवी होती. मात्र पार्टीकडून त्यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही. महागाई आणि बेरोजगारी या मुद्द्यावर भाजपच्या बद्दल नेहमी वरूण गांधी यांनी टिपणी केली होती. त्यांची उमदेवारी नाकारून तिथे उत्तर प्रदेशचे माजी खासदार जितीन प्रसाद यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

मेनका गांधी म्हणाल्या, सरकारच्या विरोधात बोलल्यामुळे आपल्या मुलाचे तिकीट कापले आहे. त्या म्हणाल्या मला विश्वास वाटतो की पक्षाच्या तिकिटाशिवाय वरुण गांधी मतदारसंघात चांगले प्रदर्शन करेल. सुरुवातीला असे वाटत होते की वरुण गांधी हे पिलभीत मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवतील. मात्र त्यांनी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीसुद्धा त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. गेल्या तीन दशकामध्ये पहिल्यांदाच मेनका गांधी किंवा वरुण गांधी पिलभीत मतदारसंघातून निवडणूक लढवत नाहीत. यावेळी वरूण गांधी यांना तिकीट मिळाले नाही याचे मात्र तिथे अजिबात आश्चर्य वाटत नाही. त्याचे कारण म्हणजे यापूर्वी गांधी यांनी शेतकरी, आरोग्य, रोजगार अशा विविध मुद्य्यावरून भाजपवर टीका केली होती.

हेही वाचा..

विश्वंभर चौधरींनी पळ काढला

ट्रकच्या धडकेत गाडी उलटली आणि बाहेर पडले सात कोटी!

छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवचरित्र विषयांवरील भव्य उपक्रम

विजय वडेट्टीवारांना हेमंत करकरेंबद्दल केलेलं वक्तव्य भोवणार; अदखलपात्र गुन्ह्याची नोंद
वरून गांधी यांच्या मातोश्री मेनका गांधी या सुलतानपूरमधून येतात आणि भाजपने त्यांना याच मतदारसंघातून दुसऱ्यादा तिकीट दिले आहे. १९९६ पासून वरून गांधी हे पिलभीतचे प्रतिनिधित्व करत आहेत. २००९ तसेच २०१९ मध्ये वरून गांधी हे पिलभीतमधून विजयी झाले होते. सुलतानपूर मतदारसंघातून आपण निवडणूक जिंकू असा विश्वास मेनका गांधी यांनी व्यक्त केला आहे. मात्र किती माताधीक्य्याने त्या विजयी होतील, या बद्दल त्यांनी बोलणे टाळले आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा