पत्रकार प्रदीप भंडारी आता भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते !

राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांच्याकडून पत्र जारी

पत्रकार प्रदीप भंडारी आता भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते !

भारतीय जनता पक्षाने प्रसिद्ध निवडणूक विश्लेषक आणि ज्येष्ठ टीव्ही पत्रकार प्रदीप भंडारी यांची राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून नियुक्ती केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि मुख्यालय प्रभारी अरुण सिंह यांनी जारी केलेल्या पत्रात ही माहिती दिली.

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी प्रदीप भंडारी यांची पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती तत्काळ प्रभावाने लागू होईल, असे पत्रात म्हटले आहे. प्रदीप भंडारी यापूर्वी ‘झी मीडिया’मध्ये सल्लागार संपादक म्हणून कार्यरत होते, तेथून त्यांनी काही काळापूर्वी राजीनामा दिला होता. प्रदीप भंडारी यांनी अनेक हिंदी न्यूज चॅनेलवर काम केले आहे. आपल्या कारकिर्दीत २५ हून अधिक भारतीय निवडणुकांचे अचूक भाकीत करण्यासोबतच, प्रदीप भंडारी यांनी ‘इंडिया न्यूज’ वर ‘जनता का मुकदमा’ हा प्राइम टाइम शो होस्ट केला आहे.

हे ही वाचा:

नीट यूजी परीक्षा रद्द होणार नाही, पुन्हा परीक्षा नाही…सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

बेवारस रुग्णांना अज्ञात स्थळी सोडणारा ससूनचा डॉक्टर निलंबित

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर नॉट रिचेबल !

भारताच्या विकसित शताब्दीची पायाभरणी करणारा अर्थसंकल्प

प्रदीप भंडारी यांनी यापूर्वी ‘रिपब्लिक मीडिया नेटवर्क’मध्ये सल्लागार संपादक म्हणूनही काम केले आहे. चित्रपट अभिनेता सुशांत सिंग राजपूतला न्याय मिळवून देण्यापासून बंगालमधील हिंसाचाराशी संबंधित सर्व प्रमुख समस्या त्यांनी ठळकपणे कव्हर केल्या आहेत. यासोबतच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर दोन पुस्तकेही लिहिली आहेत. दरम्यान, भाजपकडे एकूण ३० राष्ट्रीय प्रवक्ते आहेत, ज्याचे नेतृत्व राज्यसभा खासदार अनिल बलूनी करत आहेत.

Exit mobile version