ट्विटर आणि एलॉन मस्क समीकरण जगजाहीर झालं आहे. एलॉन मस्क यांनी ट्विटरवर मालकी हक्क मिळवल्यानंतर ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग साईटमध्ये त्यांनी अनेक मोठे बदल केले. त्यातील त्यांचा महत्वाचा निर्णय म्हणजे त्यांनी ट्विटरमधील जवळपास ५० टक्के कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला. मात्र, भारतीय मायक्रोब्लॉगिंग संकेतस्थळ ‘कू’ने ट्विटरच्या माजी कर्मचाऱ्यांना नोकरी देणार असल्याचे म्हटले आहे. यापार्श्ववभूमीवर केंद्रिय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी कू मायक्रोब्लॉगिंग साईटबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. ट्विटरची जागा आता ‘कू’ने घ्यावी, असे पीयूष गोयल म्हणाले आहेत.
पियुष गोयल हे ‘कू’ या माध्यमावर सक्रिय असतात. ते म्हणाले, सध्या ट्विटरवर बराच गोंधळ सुरु आहे. हा गोंधळ पाहून ‘कू’ या माध्यमावर मी सक्रिय असल्याचे मला समाधान वाटते. ‘कू’ या मायक्रोब्लॉगिंग साईटवर सर्वात अगोदर सक्रिय होणाऱ्यांपैकी मी एक आहे. ‘कू’ ने ट्विटरची जागा घ्यावी, असे मला वाटते. भारतीय उद्योजक आणि स्टार्टअप्समध्ये ते सामर्थ्य आहे. सध्या संपूर्ण जगच कठीण काळातून जात आहे. हाच काळ भारतासाठी एक संधी आहे. ही संधी भारताने गमवू नये,असे पीयूष गोयल म्हणाले आहेत.
हे ही वाचा :
नवले पुलावर भीषण अपघात, ट्र्कने ४७ वाहनांना उडवले
‘शिवाजी महाराजांनी माफी मागितली होती, असे वक्तव्य सुधांशू त्रिवेदींनी केलेलेच नाही’
‘वाहिन्यांवरील मराठी पत्रकार मुली साडी न नेसता शर्ट-ट्राउजर का घालतात?’
सुरक्षा दलाला मोठे यश, तीन दहशतवाद्यांना शस्त्रांसह अटक
ट्विटरने ५० टक्के कर्मचारी कपात केले आहेत. यादरम्यान, ‘कू’ ने ट्विटरच्या माजी कर्मचाऱ्यांना नोकरी देणार असल्याचे जाहीर केले आहे. ‘कू’चे सह-संस्थापक मयंक बिद्वकता यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली. ‘आम्ही ट्विटरच्या काही माजी कर्मचाऱ्यांना कामावर ठेवू. जिथे त्यांच्या प्रतिभेची कदर केली जाते तिथे ते काम करण्यासाठी पात्र आहेत,’ असे ट्विट मयंक यांनी केले आहे.
Very sad to see #RIPTwitter and related # to this going down.
We'll hire some of these Twitter ex-employees as we keep expanding and raise our larger, next round.
They deserve to work where their talent is valued. Micro-blogging is about people power. Not suppression.
— Mayank Bidawatka (@mayankbidawatka) November 18, 2022