25 C
Mumbai
Saturday, January 18, 2025
घरविशेषमुंबईतील गणेश मंडळासाठी भाजपकडून 'मुंबईचा मोरया' स्पर्धेचे आयोजन !

मुंबईतील गणेश मंडळासाठी भाजपकडून ‘मुंबईचा मोरया’ स्पर्धेचे आयोजन !

कोकणवासीयांसाठी विशेष रेल्वे, बसचे आयोजन, आशिष शेलार

Google News Follow

Related

दरवर्षी प्रमाणे यंदाही भाजपकडून गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यात येणार आहे. गणशोत्सवाच्या आगमनासाठी टीम मुंबई सज्य झाली असून भाजप कडून संपूर्ण मुंबईकरांसाठी ‘मुंबईचा मोरया’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.यास्पर्धेत मुंबईतील सर्व गणेश मंडळांनी सहभागी होण्याचे आवाहन मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी केले आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मागील वर्षीही या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी १२०० च्या वर गणेश मंडळ या स्पर्धेत सहभागी झाले होते.यंदा या संख्येत वाढ होऊन ही संख्या २,५०० च्या वर गेल्याचे आशिष शेलार यांनी सांगितले.या स्पर्धेला विशेषात्मक सहकार्य मुंबई बँकेचे लाभले असून स्पर्धेच्या आयोजनामध्ये नेते प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांचा मोठा वाटा असल्याचे, शेलार यांनी सांगितले.या स्पर्धेसाठी गणेश मंडळाचे परीक्षण करण्यासाठी मुंबईमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या ३० टीम तयार करण्यात आल्या आहेत.मुंबईमधील सर्व गणेश मंडळाचे परीक्षण या टीम कडून करण्यात येईल.याचा अहवाल आमच्याकडे आल्यानंतर यातील प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते ३ लाखांचे पारितोषिक देण्यात येणार असल्याचे, शेलार यांनी सांगितले.तसेच दुसऱ्या क्रमांकासाठी १,५०,००० लाखांचे तीन पारितोषिक आणि तृतीय क्रमांकासाठी ७५ हजारांची बक्षिसे असून ११,००० हजारांचीं १२ उत्तेजनार्थ बक्षिसांचे आयोजन करण्यात आले आहे.इतक्या मोठ्या व्यापक पारितोषिकांचा सोहळा शेलार यांनी घोषित केला.

हे ही वाचा:

व्यावसायिक हेमंत पारीख अपहरण प्रकरणी राजस्थानातील टोळीला अटक

इसीसच्या पुणे मॉड्युलमधील फरार संशयितांवर प्रत्येकी ३ लाखाचे इनाम

हसवणारे ‘बिरबल’ काळाच्या पडद्याआड

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोटार उत्पादकांना दिला हा सल्ला

चाकरमान्यांसाठी विशेष सहा ट्रेनचे आयोजन
तसेच मुंबईतील गणेश उत्सवासाठी गावाला जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी भाजपकडून बसेसचे आयोजन करण्यात आल्याचे आशिष शेलार यांनी सांगितले.विशेष कोकणवासी चाकरमान्यांसाठी सहा विशेष रेल्वेचे नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या रेल्वेचे उदघाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १५ तारखेला भारतीय जनता पार्टीचा झेंडा दाखवून सोडण्यात येणार आहे.विशेष ट्रेनमधून १५ ते १८ हजार चाकरमानी आपल्या गावाला सुखरूप जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच मुबई कोणाची म्हणून केवळ घोषणा देणार खूप आहेत, असे घोषणा देणारे घराची कडी लावून फक्त घरात बसतात, असा टोलाही विरोधकांना शेलार यांनी लगावला.तसेच गणेशउत्सवासाठी कोकण विकास आघाडीच्या माध्यमातून संपूर्ण मुंबईसाठी एकूण २५६ बसेसचे आयोजन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
223,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा