29 C
Mumbai
Friday, September 20, 2024
घरविशेषमुंबईत भाजपाकडून ४०० ठिकाणी दहीहंडी उत्सव !

मुंबईत भाजपाकडून ४०० ठिकाणी दहीहंडी उत्सव !

भाजपकडून ४५० मंडळांच्या २५ हजार गोविंदांना १० लाखाचे विमा कवच

Google News Follow

Related

महायुती सरकारच्या काळात दणक्यात हिंदू सण साजरे होत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई भाजपातर्फे ४०० हून अधिक ठिकाणी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. वरळी विधानसभा मतदारसंघातील जांबोरी मैदानातून परिवर्तनाची दहीहंडी सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. त्याचबरोबर मुंबईत भाजपाकडून ४५० मंडळांच्या २५ हजार गोविंदांना १० लाखाचे विमा कवच देण्यात आल्याची माहिती मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी दिली. वरळी जांबोरी मैदानावरील दहीहंडीचे पहिले बक्षीस ३ लाख ३३ हजार रुपये आहे. तर विजेत्यांना उत्कृष्ट पारितोषिक व सन्मान चिन्ह दिले जाणार आहे.

हे ही वाचा:

किशोरी पेडणेकर यांना अटक होणार? आर्थिक गुन्हे शाखेने ११ तारखेला बोलावले

सोमय्या प्रकरणी ‘लोकशाही’चे कमलेश सुतार यांच्यावर गुन्हा

सरकार तर पडत नाही; निदान राजीनामे तरी द्या!

रोव्हर प्रज्ञानने घेतली चंद्राची रंगीबेरंगी छायाचित्रे

मुंबई भाजपाकडून विविध ठिकाणी दरवर्षी दहीहंडीचे आयोजन केले जाते. मुंबईतील सण उत्सव आणि परंपरा जपण्यासाठी भाजपाच्या वतीने सातत्याने प्रयत्न केले जातात. यंदाही भाजपकडून आयोजित सराव शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. १५० हून अधिक गोविंदा पथक शिबिरात सहभागी झाले होते. प्रत्येकाने साधारण पाच ते सहा थर रचून सलामी दिली. प्रत्येक पथकाला बक्षिसाने गौरवण्यात आले. मुंबईतील यंदाची दहीहंडी परिवर्तनाची असेल अशी आश्वासक प्रतिक्रिया मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी दिली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
178,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा