कर्नाटकातील भ्रष्टाचाराचा फायदा राहुल गांधींना झाला!

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप भंडारी यांचा आरोप

कर्नाटकातील भ्रष्टाचाराचा फायदा राहुल गांधींना झाला!

कर्नाटकातील भ्रष्टाचाराचा फायदा राहुल गांधींना झाला असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी सोमवारी केला. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या कुटुंबाने त्यांचा मुलगा राहुल खर्गे यांनी चालवलेल्या ट्रस्टला दिलेली पाच एकर जमीन परत करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी हे विधान केले.

कर्नाटक काँग्रेस सरकारचे केवळ भ्रष्टाचारावर लक्ष आहे. गरिबांकडून जमीन घेऊन त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची तिजोरी भरते. मल्लिकार्जुन खर्गे आणि सिद्धरामय्या दोघेही राहुल गांधींना आपले गुरू मानतात. मग, राहुल गांधी या दोघांचे भ्रष्टाचाराचे गुरू होते का ? कर्नाटक काँग्रेस सरकार हे आजपर्यंतचे सर्वात भ्रष्ट सरकार असल्याचे सिद्ध झाले आहे आणि कर्नाटकात होत असलेल्या भ्रष्टाचाराचे लाभार्थी राहुल गांधी होते, असा आरोप त्यांनी केला.

भंडारी यांनी असेही सांगितले की, मल्लिकार्जुन खर्गे यांच्या पदामुळे त्यांच्या मुलाच्या ट्रस्टला लाभ मिळाला आहे. त्यामुळेच त्यांनी ट्रस्टला दिलेली पाच एकर जमीन परत करण्याचा निर्णय घेतला. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी MUDA घोटाळ्यात त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना लाभ मिळवून देण्यासाठी जी मोडस ऑपरेंडी वापरली आहे ती KIADB जमीन प्रकरणामध्ये मल्लिकार्जुन खर्गे यांनी वापरलेल्या पद्धतीसारखीच आहे, असे भंडारी म्हणाले.

दरम्यान, भाजप खासदार प्रवीण खंडेलवाल यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या कुटुंबाने त्यांचा मुलगा राहुल खर्गे याने चालवल्या जाणाऱ्या ट्रस्टला दिलेली पाच एकर जमीन परत करण्याचा निर्णय हा संभाव्य फसवणुकीचा संकेत असल्याचे म्हटले. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. यावरून हे स्पष्ट होते की वाटप केलेल्या जमिनीत काही फसवणूक झाली होती आणि फसवणूक उघडकीस आल्यानंतर ते जमीन परत करत आहेत. यामुळे एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे आणि या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, असे खंडेलवाल यांनी एएनआयला सांगितले.

हे ही वाचा : 

४८ तासात १३ विमान कंपन्यांना धमक्या !

लाडकी बहिण योजनेला बंद कराल तर ‘करेक्ट कार्यक्रम’ झालाच समजा!

सीमेपलीकडील दहशतवाद दोन देशांमधील व्यापार आणि संबंधांमध्ये अडथळा आणतात

एकीकडे विरोधकांचा योजनेसाठीच्या पैशांवर सवाल; दुसरीकडे योजनेची रक्कम वाढवण्याचं आश्वासन

अलीकडे, कथित MUDA जमीन वाटप घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात ED ने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांच्या पत्नीने MUDA आयुक्तांना पत्र लिहून प्राधिकरणाने त्यांना वाटप केलेले १४ भूखंड परत करार असल्याचे सांगितले.

२७ सप्टेंबरच्या न्यायालयाच्या आदेशानंतर म्हैसूर लोकायुक्तांनी अधिकृतपणे या प्रकरणाची चौकशी आणि तपास सुरू केला. लोकायुक्तांना MUDA द्वारे सिद्धरामय्या यांच्या पत्नी पार्वती यांना ५६ कोटी रुपयांच्या १४ जागा वाटप करण्यात आलेल्या बेकायदेशीरतेच्या आरोपांची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. MUDA ने सिद्धरामय्या यांच्या पत्नीला म्हैसूर शहरात बेकायदेशीरपणे १४ जागा दिल्याचा आरोप आहे.

 

Exit mobile version