केशवजी नाईक चाळ गणेशोत्सवाला नड्डा यांची भेट!

टिळकांच्या प्रेरणेने मुंबईतील सर्वात पहिला गणेश उत्सव नाईक चाळीत साजरा

केशवजी नाईक चाळ गणेशोत्सवाला नड्डा यांची भेट!

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे त्यांच्या ऐतिहासिक गणेश उत्सव दौऱ्यासाठी आज दि. २५ सप्टेंबर रोजी मुंबईमध्ये दाखल झाले होते.या भेटीदरम्यान नड्डा यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आणि त्यानंतर केशवजी नाईक चाळ येथील गणपतीचे दर्शन घेतले. गिरगावातील केशवजी नाईक चाळीच्या सार्वजनिक गणेश उत्सवाचे हे १३१ वे वर्ष आहे.विशेष म्हणजे याठिकाणी लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने मुंबईतील सर्वात पहिला गणेश उत्सव साजरा करण्यात आला होता.जे. पी. नड्डा यांच्या भेटीच्या प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मंत्री मंगल प्रभात लोढा,प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आदी उपस्थित होते.

हे ही वाचा:

शरद पवारांच्या पत्रकारांबद्दलच्या भूमिकेचा व्हिडिओ पुन्हा व्हायरल !

काश्मीरवरील पाकच्या अतिक्रमणाबाबत जीनिव्हामध्ये निदर्शने !

२६/११ हल्ला प्रकरणात चौथे पुरवणी आरोपपत्र दाखल, कॅप्टन तहव्वूर हुसैन राणाचा आरोप पत्रात उल्लेख

भारतीय वायुदलात ‘सी-२९५’ वाहतूक विमान दाखल!

जे. पी. नड्डा यांचे मराठमोळ्या पद्धतीने जे पी नड्डा यांचे स्वागत करण्यात आले.स्थानिकांना अभिवादन करून नड्डा यांनी उपस्थित मान्यवरांसह गणपतीचे दर्शन घेतले आणि नागरिकांशी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्राची संस्कृती विविध कार्यक्रमातून सादर करण्यात आली. जे. पी. नड्डा यांनी अतिशय आनंदाने या परंपरेचा अनुभव घेतला आणि उत्सुकतेने त्याचे महत्व जाणून घेतले. यावेळी दहीहंडी पथकाने दिलेली मानवंदना हे विशेष आकर्षण ठरले.

Exit mobile version