27 C
Mumbai
Friday, April 11, 2025
घरविशेषकुठल्यातरी सोम्या-गोम्या, अर्ध्या हळकुंडाने पिवळ्याच्या झालेल्या कार्यकर्त्यांनी...

कुठल्यातरी सोम्या-गोम्या, अर्ध्या हळकुंडाने पिवळ्याच्या झालेल्या कार्यकर्त्यांनी…

भाजपाच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी पदाधिकाऱ्यांचे टोचले कान 

Google News Follow

Related

पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉ. सुश्रुत घैसास यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर तनिषा भिसे यांच्या उपचाराकरिता १० लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. रक्कम भरू न शकल्याने तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त करत निदर्शने करण्यात आली होती. तसेच डॉ. सुश्रुत घैसास यांच्या रुग्णालयाची तोडफोड केली होती. या प्रकरणावरून भाजपाच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी शहराध्यक्ष धीरज घाटेंना पत्र लिहिले आहे. कुठल्यातरी सोम्या-गोम्या, अर्ध्या हळकुंडाने पिवळ्याच्या झालेल्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊन करण्याचं काम नाही, असे मेधा कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

मेधा कुलकर्णी पत्रात म्हणाल्या, गर्भवतीचा मृत्यू ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. माझ्या संपूर्ण संवेदना दिवंगत मातेविषयी, तिच्या दोन अर्भकांविषयी आणि तिच्या कुटुंबाविषयी आहेत. असा प्रसंग कुणावरही येऊ नये. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने आपला सविस्तर खुलासा केला आहे. अनामत रक्कम मागण्यात आलेली नव्हती, उलट न कळवताच नातेवाईक रुग्णाला घेऊन गेल्याचं स्पष्टीकरणात म्हटले आहे. प्रसुती जोखमीची असल्याने मूल दत्तक घेण्याचा सल्ला आणि इतर अनेक वैद्यकीय सल्ले डावलून महिलेच्या आयुष्याशी धोका पत्करुन कुटुंबीयांकडून निर्णय घेण्यात आले असे तपशील खुलाशात आहेत. त्याची शहानिशा करुन चूक घडली असल्यास वरिष्ठांनी योग्य ती कारवाई करणं अपेक्षित आहे.

परंतु यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा किती दोष आहे? याची माहिती करुन न घेता भाजपाच्या महिला मोर्चाच्या सदस्यांनी उन्मादात जे वर्तन केले त्याबाबत सर्वसामान्यांमध्ये प्रचंड रोष आहे. इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जी विधाने केली त्याविषयी मी आत्ता बोलत नाही कारण तो आपला विषय नाही. शिवाय आपल्या मतदारांची आपल्या पक्षाप्रति निष्ठा आहे, प्रेम आणि आशीर्वादही आहेत, असे मेधा कुलकर्णी यांनी म्हटले.

डॉ. सुश्रुत घैसास यांच्या वडिलांच्या क्लिनिकमध्ये जाऊन तोडफोड करणे हे भाजपाच्या पुणे महिला मोर्चाच्या अध्यक्षा हर्षदा फरांदे आणि इतर पदाधिकाऱ्यांना निश्चितच शोभले नाही. आंदोलन करण्याच्या सभ्य पद्धती आहेत, ज्याचा अवलंब करणे विचारधारेला धरुन ठरेल असे मला वाटते. इतर क्षेत्रांप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रात अनेक बऱ्या वाईट गोष्टी घडत असतात हे खरे असले तरीही चांगले डॉक्टर अस्तित्वात आहेत यावर माझा भरवसा आहे, हे एका डॉक्टरची मुलगी या नात्याने मी खात्रीपूर्वक सांगू शकते.

हे ही वाचा : 

दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या डॉ. सुश्रुत घैसास यांचा राजीनामा!

सौदी अरेबियाने भारतासह १४ देशांच्या व्हिसावर घातली बंदी; कारण काय?

एलपीजी सिलेंडर ५० रुपयांनी महागले!

“टीम इंडियातून बाहेर – पण आयपीएलमध्ये फायर!”

त्या पुढे म्हणाल्या, कुठल्यातरी सोम्या-गोम्या, अर्ध्या हळकुंडाने पिवळ्याच्या झालेल्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊन करण्याचं काम नाही. शिवाय डॉ. सुश्रुत घैसास यांच्या वडिलांच्या हॉस्पिटलचा या घटनेची काही संबंध नसताना केलेले मोडतोडीचं उर्मट कृत्य अनेकांच्या जिव्हारी लागले आहे. या संदर्भात नागरिकांचे नाराजीचे फोन मला सातत्याने येत आहेत. दिल्लीतील अधिवेशनातून परतल्यावर मी याबाबत माहिती घेतली असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले.

तसेच पक्षाची प्रतिमा, व्यक्तीची राजकीय प्रतिमा या सर्व गोष्टी बनण्यासाठी वेळ लागतो. परंतु अशा काही गोष्टींमुळे प्रतिमा डागाळली जाते आणि त्याचा परिणाम सगळ्यांनाच भोगावा लागतो. शिवाय वड्याचे तेल वांग्यावर काढल्याने विनाकारण एखाद्या व्यक्तीचे, समूहाचे किंवा विशिष्ट समाजाचे कायमस्वरुपी नुकसान होऊ शकते.

राजकीय व्यक्तींनी कायमच कृतीला विचारांची जोड देऊन कार्य करणे आवश्यक असते. सवंग प्रसिद्धीच्या मागे लागून पुढे जाम्याचे किंवा इतरही अनेक सोपे मार्ग निवडण्याचे मोह कार्यकर्त्यांनी टाळले पाहिजेत. हे समजावून सांगण्याचे कार्य आपण शहराध्यक्ष या नात्याने कराल आणि महिला मोर्चा पदाधिकाऱ्यांना समज देऊन त्यांना त्यांच्या पदाचा समजदारपणे आणि विनम्रतेने वापर कर्यास सांगाल अशी अपेक्षा करते. अनुभव नसल्याने चूक होऊ शकते पण लक्षात आल्यावर ती दुरुस्त करणे आवश्यक आहे. हा प्रश्न, हा मुद्दा मी सर्वांच्या सद्सद् विवेक बुद्धीवर सोडते आहे, असे मेधा कुलकर्णी म्हणाल्या. दरम्यान, या प्रकरणी चौकशीसाठी समिती नेमण्यात आली आहे. चौकशी सुरु करण्यात आली आहे. अशातच डॉ. सुश्रुत घैसास यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
241,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा