भारतीय जनता पक्षाचे लोकसभा सदस्य प्रताप सिम्हा यांनी रविवारी संसदेच्या सुरक्षेबाबत मोठे वक्तव्य केले आहे.ते म्हणाले की, लोकसभा २०२४च्या निवडणुकीमध्ये जनता ठरवेल की, मी देशभक्त आहे की देशद्रोही.
प्रताप सिम्हा म्हणाले की, माझ्यावर जे देशद्रोहाचे आरोप लावण्यात आले आहेत, ते खरे आहेत की खोटे आहेत हे ठरवण्यासाठी मी देवावर आणि माझ्या चाहत्यांवर सोडले आहे.तेच ठरवतील मी खरा आहे की खोटा आहे.
१३ डिसेंबर रोजी संसदेत दोन तरुणांनी घुसखोरी करून नळकांड्या फोडत घोषणाबाजी केली होती.त्यांनतर देशभरात एकच खळबळ उडाली.या प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांपैकी एकाकडे प्रताप सिम्हा यांच्या कार्यालयाकडून जारी करण्यात आलेला प्रवेश पास सापडला होता.विरोधकांनी संसदेच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत सत्ताधारी पक्षावर टीका केली.त्यानंतर प्रताप सिम्हा यांच्यावर देशद्रोहाचा आरोपही करण्यात आला होता.यावर प्रताप सिम्हा यांनी उत्तर दिली आहे.
हे ही वाचा:
राम लल्ला प्राणप्रतिष्ठेसाठी सीताराम येचुरी उपस्थित राहणार नाहीत
काँग्रेस नेते सुनील केदारांची आमदारकी रद्द, पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा!
हिजाब बंदीवरून सिद्धरामय्या यांचा युटर्न
ठाण्यात आता तांबड्या पांढऱ्या रंगाचा ‘झेब्रा’
प्रताप सिम्हा म्हणाले की, प्रताप सिम्हा हा देशद्रोही की देशभर हे म्हैसूरच्या डोंगरावर बसलेली चामुंडेश्वरी आणि ब्रह्मगिरीवर बसलेली कावेरी माता ठरवेल.गेली २० वर्ष मी लिहिलेली माझी पुस्तके वाचणारे कर्नाटकातील माझे चाहते आणि गेली साडे नऊ वर्ष माझे काम पाहणारे म्हैसूर आणि कोडागु येथील जनता ठरवेल, ते पुढे म्हणाले.
प्रताप सिम्हा याना देशद्रोही संबोधणाऱ्या पोस्टरबाबतही प्रश विचारण्यात आला.तेव्हा ते म्हणाले, जनता न्यायाधीश आहे.मी देशद्रोही, देशभक्त आहे हे जनता ठरवेल.मी सर्व काही त्यांच्या निर्णयावर सोडले आहे.यावर मला अधिक काही सांगायचे नाही,ते पुढे म्हणाले.
संसदेच्या सुरक्षेत हलगर्जीपणाच्या घटनेनंतर काँग्रेस आणि इतर काही विरोधी संघटनांनी प्रताप सिम्हा यांच्या विरोधात निदर्शने केली होती.या विरोधकांचा जबाब पोलिसांनी नोंदवला का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले, मला जे काही बोलायचे होते ते मी बोललो आहे, या विषयावर आणखी मला काही बोलायचे नाही, असे प्रताप सिम्हा म्हणाले.