23 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरविशेष'प्रकल्पांना विरोध करायचा, मग ओरड करायची, हेच विरोधकांचे धोरण'

‘प्रकल्पांना विरोध करायचा, मग ओरड करायची, हेच विरोधकांचे धोरण’

भाजपा आमदार अतुल भातखळकरांचा विरोधकांवर घणाघात

Google News Follow

Related

महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातमध्ये गेले हे सातत्याने खोटं बोलण्याचं काम महाविकास आघाडी करते आहे अशी घणाघाती टीका भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी एका खुल्या चर्चेच्या कार्यक्रमात केली. न्यूज स्टेट महाराष्ट्र गोवा या मीडिया वाहिनीने या चर्चेचे आयोजन केले होते. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्रात येणारा नाणारचा प्रकल्प, वाढावण बंदर प्रकल्प याला विरोध करुन महाराष्ट्राचा विकास अडवून ठेवायचा, स्वतःच्या सरकारच्या  काळात प्रकल्प घालवायचे आणि प्रकल्प बाहेर गेले कि आरडा ओरडा करायचा असं विरोधकांचं धोरण आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी आपल्या एक्स अकाऊंटवरून महायुतीला घेरण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी महायुती सरकारवर हल्ला करत महाराष्ट्रातला टाटा एयरबस प्रकल्प गुजरातमध्ये जाण्यासाठी महायुती जवाबदार असल्याचा आरोप लावला होता. यात ते म्हणाले, ‘…एअरबस- टाटा’ यांचा हवाई दलासाठी विमाननिर्मितीचा सुमारे २२ हजार कोटींचा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये होणार होता. मात्र भ्रष्टयुतीच्या हलगर्जीपणामुळे तो गुजरातला गेला… ’

पण वस्तुस्थिती पाहता असं लक्षात येतं कि, टाटा एयरबस ने २४ डिसेंबर २०२१ लाच गुजरातमध्ये जीएसटीसाठी अर्ज केला होता. थोडक्यात टाटा एयरबसचा प्रकल्प जेंव्हा गुजरातमध्ये नोंदणी करत होता तेंव्हा महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सत्तेत होती.

हे ही वाचा : 

सिंचन घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश देऊन आर. आर. पाटलांनी केसाने गळा कापला

तिहार जेलचा वॉर्डनच चालवत होता ड्रगची प्रयोगशाळा, ९५ किलो ड्रग्ज छाप्यात जप्त!

लष्कराच्या वाहनावर हल्ला प्रकरणात ठार झालेल्या दहशतवाद्यांची चित्रे जारी!

शरद पवारांची पाचवी यादी; पंढरपूर, माढा जागेवर दिले उमेदवार

ते पुढे म्हणाले “ कायम प्रकल्प बाहेर गेले, गुजरातला गेले असा ओरडा करायचा. नाणारच्या ७० हजार कोटींच्या प्रकल्पाला विरोध यांच्या सरकारने केला. वाढवणं बंदराच्या निर्मितीला विरोध यांच्या सरकारने केला. प्रकल्प आले कि त्याला विरोध करायचा, ते गेले कि पुन्हा ओरड करायची. आजही मुंबईत मेट्रो, कोस्टल रोड, रोडचं सीसीकरण कोणामुळे झालंय? प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मा. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात झालंय. आज परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत मागच्या दोन वर्षांत महाराष्ट्र क्र. १ ला आल्याचे भातखळकरांनी सांगितले.

यावेळी मागील पाच-दहा वर्षांतल्या आपल्या कामाविषयी सांगितले. ते म्हणाले, “कामं खूप झाली आहेत, मागच्या दहा वर्षांत खरंतर दहा वर्षांत कांदिवली पूर्व मतदारसंघात विकासकामांचा झंजावात या राज्य सरकार ने केंद्र सरकारने माझ्या माध्यमातून उभा केला. ९० फिट रुंद आकुर्ली सबवे, डीपी रोड निर्माण, वाहुतक समस्या सोडवणं, अनेक गार्डन्स निर्माण करणं अशी बरीच कामं महायुती सरकार ने माझ्या माध्यमातून केली. त्यामुळे आम्ही आता इथे ‘शत-प्रतिशत मतदान’ घडवून आणण्याच्या प्रयत्नात आहोत, ज्याने आम्हांला सव्वा लाखाची लीड आरामात मिळेल”, असा विश्वास यावेळी आमदार भातखळकरांनी व्यक्त केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा