कांदिवली पूर्व विधानसभेतील विविध रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामांची गुरुवारी कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी पाहणी केली.
महानगरपालिकेच्या पी/नॉर्थ वॉर्ड येथील साई बाबा मंदिर दिंडोशी पोलिस स्टेशन पासून डायाभाई पटेल मार्ग, राधा कुंज क्रॉस रोड, पोद्दार सर्कल मालाड पूर्व, शिवाजी चौक मार्ग, दादा सावे मार्ग, चित्तभाई पटेल मार्ग कांदिवली पूर्व ते अकुर्ली क्रॉस रोड आणि अनिता नगर कांदिवली पूर्व आर/साऊथ वॉर्ड पर्यंत रस्त्यांच्या कामाची पाहणी अतुल भातखळकर यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह पाहणी केली.
हे ही वाचा:
भाजपा सरकार हटेल तेव्हा वक्फ विधेयक रद्द करू!
“वक्फ (सुधारणा) विधेयकाचा गाभा म्हणजे देशाच्या संविधानापेक्षा कोणीही वर नाही”
एकनाथ शिंदे म्हणजे ‘एसंशि’ तर UT म्हणजे ‘युज ॲंड थ्रो’
“पूल शॉटचा अंदाज चुकला, कोहलीचा खेळ संपला!
विद्यार्थ्यांना, नागरिकांना आणि आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना रस्त्यांच्या अर्धवट कामांमुळे अनेक अडचणी येतात अपघात होतात. अनेकदा सूचना देऊन सुद्धा रस्त्यांची कामं कालबद्द पद्धतीने का होत नाहीत असा प्रश्न देखील भातखळकर यांनी अधिकाऱ्यांना या प्रसंगी विचारला.
पावसाळा येत आहे, सर्व रस्त्यांची कामं तातडीने पूर्ण करा जेणेकरुन नागरिकांची कोणत्याही प्रकारे गैर सोय होऊ नये. रस्त्यांच्या कामांतील सर्व अडसर आता दूर करुन ३१ मे २०२५ पर्यंत कामं पूर्ण करा असे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आमदार अतुल भातखळकर यांनी पाहणी दरम्यान सूचित केले.