भाजपकडून लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांची दुसरी यादी लवकरच जाहीर होऊ शकते. त्यात हरयाणातील रोहतक या मतदारसंघाची जोरदार चर्चा सुरू आहे. या मतदारसंघातून अभिनेता रणदीप हुड्डा याला मैदानात उतरवण्याचा मनसुबा भाजपचा आहे. रोहतक मतदारसंघासाठी ज्या तीन उमेदवारांची नावे काढण्यात आली आहेत, त्यात पहिल्या क्रमांकावर रणदीप हुड्डा याचे नाव आहे. तर, डॉ. अरविंद शर्मा आणि ओपी धनखड यांचीही नावे चर्चेत आहेत.
एका वृत्तवाहिनीने हुड्डा यांच्या कुटुंबाशी याबाबत संपर्क साधला. मात्र त्यांनी याबाबत काहीही सांगण्यास नकार दिला. ‘भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिला आहे. मात्र याबाबत त्याने कोणताही निर्णय घेतलेला नाही. रणदीपचा लवकरच एक चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तो या चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र आहे. त्याचे भविष्य चित्रपटांमध्ये आहे. याबाबत तो काही निर्णय घेईल, तो स्वतः घेईल,’ असे रणदीपने स्पष्ट केले.
हे ही वाचा :
डीआरआयची कारवाई; मुंबईतून २४ किलो सोनं जप्त
सीरियामध्ये दहशतवाद्यांचा गावकऱ्यांवर अंदाधुंद गोळीबार; १८ जणांचा मृत्यू
ईडीच्या समन्सकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी अरविंद केजरीवालांना न्यायालयाकडून समन्स
अमेरिकन डॉलर्सच्या बहाण्याने व्यावसायिकांची फसवणूक करणाऱ्या परराज्यातील टोळीचा पर्दाफाश!
रोहतक लोकसभा मतदारसंघातील माजी मुख्यमंत्री भूपेंद्र हुड्डा यांचा मुलगा दीपेंद्र हुड्डा याला टक्कर देण्यासाठी भाजप मजबूत उमेदवाराच्या शोधात आहे. त्यामुळेच जी तीन नावे चर्चेत आहेत, त्यात रणदीप हुड्डा याचे नाव आघाडीवर आहे.
कोण आहे रणदीप हुड्डा?
अभिनेता रणदीप हुड्डा याचे कुटुंब मूळचे जासिया गावाचे आहे. तो जाट समाजातील आहे. त्यानंतर चित्रपटात कारकीर्द घडवण्यासाठी तो मुंबईला आला. मात्र तो नियमितपणे गावी येत असतो. रणदीपने कुंजपुरा सैनिक स्कूलमधून शिक्षण घेतले आहे. त्यांनी काही वर्षे ऑस्ट्रेलियामध्येही व्यतीत केली आहेत. तिथे त्यांनी नोकरीसह शिक्षणही घेतले. त्यानंतर तो मुंबईत आला. तो मुंबईत वडील रणबीर हुड्डा व आई आशा हुड्डा यांच्यासोबत राहतो. रणदीपची आई भाजपची वरिष्ठ कार्यकर्ती असून त्यांनी महिला मोर्चाचे अध्यक्षपदही भूषवले आहे.