न्याय संहिता, गरिबांना घरे, मोफत अन्न, नोकऱ्यांची हमी…. भाजपचा जाहीरनामा मोदींनी केला घोषित!

'संकल्प पत्र' नावाने प्रसिद्ध केला जाहीरनामा

न्याय संहिता, गरिबांना घरे, मोफत अन्न, नोकऱ्यांची हमी…. भाजपचा जाहीरनामा मोदींनी केला घोषित!

देशात भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर देशात ‘न्याय संहिता’ लागू करणार असल्याची घोषणा आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपचा जाहीरनामा प्रसिध्द करण्यात आला. या जाहीरनाम्याला भाजपने ‘संकल्प पत्र’ असे नाव दिले आहे. या संकल्प पत्राच्या माध्यमातून पुढील पाच वर्ष मोफत धान्य योजना सुरु ठेवणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. समाजातील विविध घटकांशी निगडीत अनेक योजना या संकल्प पत्राच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ ही संकल्पना साकार करण्याचा संकल्प आम्ही पुढे नेऊ. राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने ‘समान नागरी संहिते’ला भाजप देखील तितकेच महत्वाचे मानत असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.’संपूर्ण देश भाजपच्या जाहीरनाम्याची खूप वाट पाहत होते. यामागे एक मोठे कारण असल्याचे त्यांनी सांगितले.ते पुढे म्हणाले, गेल्या १० वर्षात भाजपाने जी आश्वासने दिली ती सर्व आश्वासने पूर्ण केली आहेत.हा जाहीरनामा विकसित भारतातील सर्व ४ मजबूत आधारस्तंभावर म्हणजे युवा, शेतकरी, नारी शक्ती, गरीबांवर आधारित आहे.मोफत राशनची योजना पुढील पाच वर्ष सुरु राहणार आहे.तसेच गरिबांना दिले जाणारे अन्न पौष्टिक, समाधानकारक आणि परवडणारे असणार आहे, अशी खात्री पंतप्रधान मोदींनी यावेळी दिली.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, ‘आता भाजपने संकल्प केला आहे की ७० वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला आयुष्मान योजनेच्या कक्षेत आणले जाईल. ७० वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्ती, मग तो गरीब, मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय, ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार सुविधा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.ते पुढे म्हणाले की, ‘भाजप सरकारने गरिबांसाठी ४ कोटी पक्की घरे बांधली.गरिबांसाठी आणखी ३ कोटी घरे बांधण्याचा आमचा संकल्प आहे.आत्तापर्यंत आम्ही प्रत्येक घरापर्यंत स्वस्त सिलिंडर पोहोचवले आहेत, आता आमचा प्रत्येक घरात पाईपलाईनने गॅस पोहोचविण्याचा संकल्प आहे, पंतप्रधान मोदी म्हणाले.

हे ही वाचा:

काँग्रेस नेते आणि समर्थकांकडून ‘नेल्सन-दैनिक भास्कर सर्वेक्षणा’त ‘इंडिया’ गटाचा विजयाचा अंदाज वर्तवणारे बनावट कात्रण व्हायरल!

संदेशखालीत मानवाधिकारांचे उल्लंघन!

इराणने जप्त केलेल्या इस्रायलशी संबंधित जहाजावर १७ भारतीय!

रोड शो दरम्यान दगडफेकीत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जखमी!

गेल्या १० वर्षात आम्ही दिव्यांगांसाठी अनेक सुविधा दिल्या आहेत.पंतप्रधान आवास योजनेत आता दिव्यांग मित्रांना प्राधान्य दिले जाईल, त्यांना त्यांच्या विशेष गरजेनुसार घरे मिळावीत यासाठी विशेष काम केले जाईल.गावातील शेतकऱ्यांना सशक्त करण्याचे काम केले जात आहे. आमच्या पशुपालक आणि मच्छीमार बंधू-भगिनींना किसान क्रेडिट कार्डच्या कक्षेत समाविष्ट करून घेणारा भाजपच आहे. देशातील १० कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचा लाभ भविष्यातही मिळत राहणार असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले.

भाजपच्या जाहीरनाम्यात मोठ्या घोषणा
मोफत रेशन योजना पुढील ५ वर्षे सुरू राहणार.
पीएम किसान योजनेचा लाभ या पुढेही दहा कोटी शेतकऱ्यांना मिळणार.
सहकारातून समृद्धीच्या दृष्टीकोनातून भाजपा राष्ट्रीय सहकार धोरण आणणार
देशभरातील दुग्धव्यवसाय आणि सहकारी संस्थांची संख्याही वाढवण्यात येणार
पंतप्रधान आवास योजनेत आता दिव्यांगांना प्राधान्य दिले जाईल
जेनेरिक औषधांची केंद्र आणखी वाढवण्यात येणार
उज्ज्वला योजनेची सबसिडी पुढील एका वर्षांपर्यंत वाढविण्यात येणार
महिला खेळाडूंना विशेष सुविधा देणार
कोट्यवधी लोकांची वीजबील शून्य करण्यावर भर देण्यात येणार
कृषी क्षेत्रावर विशेष लक्ष, देशात फूड प्रोसेसिंग हब बनणार
महिला सक्षमीकरणासाठी प्राधान्य देण्यात येणार
देशातील ३ कोटी महिलांना लखपती दीदी बनवणार , महिलांना आयटी, टुरिझमकडे वळवणार
मुद्रा योजना १० लाखांवरून २० लाखांपर्यंत कर्ज दिले जाईल
देशात ५G चा विस्तार करण्यात येणार असून ६G वर काम सुरु करण्यात येईल
गरिबांना दिले जाणारे अन्न पौष्टिक समाधानकारक आणि परवडणारे असणार
७० वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला आयुष्मान योजनेच्या कक्षेत आणले जाणार
७० वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्ती, मग तो गरीब, मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय, ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार सुविधा मिळणार.
गरीबांसाठी आणखी तीन कोटी घरे बांधणार
मुद्रा योजनेची व्याप्ती २० लाखांपर्यंत वाढवणार
तृतीयपंथी समुदायाला आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळणार
गुंतवणुकीद्वारे जीवनमान, जीवनाचा दर्जा आणि नोकऱ्यांवर लक्ष देण्याचा प्रयत्न
घराघरांपर्यंत पाईपलाईनने गॅस पोहचवण्यात येणार
याशिवाय अनेक मोठमोठ्या घोषणा भाजपने आपल्या जाहीरनाम्यात केल्या आहेत

Exit mobile version