महान राष्ट्रभक्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या काँग्रेस पक्षाला महाराष्ट्र भाजपाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कथित माफीनाम्याचा संदर्भ घेऊन सावरकरांवर खोटे आरोप करणाऱ्या काँग्रेस पक्षाला भाजपाने राहुल गांधी यांच्या माफीनाम्याची आठवण करून दिली आहे.
काँग्रेस पक्षाच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून सावरकरांचा अपमान करणारा एक व्हिडिओ सोमवार, १३ सप्टेंबर रोजी पोस्ट करण्यात आला होता. एका मिनिटाच्या या व्हिडिओमध्ये काही कारण नसताना पुन्हा एकदा सावरकरांच्या कथित माफीनाम्याचा विषय काढून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या व्हिडिओमध्ये सावरकरांचा फोटो वापरण्यात आला असून बॅकग्राऊंडला जस्टिन बीबर या प्रसिद्धी इंग्रजी पॉप गायकाच्या ‘सॉरी’ या गाण्याचे बोल वाजत आहेत. या व्हिडिओच्या सुरूवातीलाच इंग्रजीमध्ये ‘इंग्लंडच्या राजाला उद्देशून..’ असे शब्द लिहून येतात आणि मग पुढे संपूर्ण गाणे वाजते.
हे ही वाचा:
कौतुकास्पद! भारतीय दिव्यांग पोहोचले सियाचीन शिखरावर!
शिया मुसलमानांवर अन्याय होत असल्याने इराण तालिबानवर नाराज?
लवकरच कंगना दिसणार सीता मैय्याच्या भूमिकेत
अमरिंदर म्हणतात, शेतकरी आंदोलन पंजाबात नको, तिकडे दिल्लीत करा!
याच काँग्रेसच्या व्हिडिओला उत्तर देताना महाराष्ट्र भाजपाने जस्टिन बीबरचे तेच गाणे वापरले आहे. तर सोबत राहुल गांधी यांनी माफी मागितल्याच्या बातमीचे संदर्भ फोटो स्वरूपात दिले आहेत. या व्हिडिओची सुरुवातच राहुल गांधी यांनी माफी मागितल्याच्या बातमीने होते. वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जाणीवपूर्वक अपमान करणाऱ्या राहुल गांधी यांच्या काँग्रेस पक्षाला ही सणसणीत चपराक मानली जात आहे.