‘जागतिक महिला दिना’निमित्त अनेक भाजपा नेत्यांकडून मानवंदना

‘जागतिक महिला दिना’निमित्त अनेक भाजपा नेत्यांकडून मानवंदना

आज ‘जागतिक महिला दिना’निमित्त अनेक भाजपा नेत्यांकडून शुभेच्छांचे ट्वीट करण्यात आले आहे. यामध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रिय गृहमंत्री अमित शहा, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, महाराष्ट्रातील विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणविस, भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांचा समावेश आहे.

हे ही वाचा:

“…नाहीतर गृहनिर्माण मंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव आणू” – आमदार अतुल भातखळकरांचा इशारा

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी, आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा देतानाच, ‘वेगवेगळ्या क्षेत्रांत महिला उत्तुंग कामगिरी करत आहेत. आपण स्त्री-पुरूष समानता समाप्त करण्याचा पण करू असे ट्वीट केले आहे.’

पंतप्रधानांनी देखील ट्वीट करून, नारी शक्तीला वंदन केले आहे. त्याबरोबरच ‘भारताला महिलांच्या विविध क्षेत्रातील यशस्वी कामगिरीबद्दल अभिमान आहे’ असे देखील म्हटले आहे. स्त्रियांच्या सशक्तीकरणासाठी विविध क्षेत्रांत काम करायला मिळणे हा सरकारचा सन्मान असल्याचे देखील ते म्हणाले आहे.

याबरोबरच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये मोदी सरकारने महिला सशक्तीकरणासाठी आखलेल्या विविध योजनांचा उल्लेख केला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील ट्वीट मध्ये स्त्रियांना साहस, शौर्य आणि समर्पणाचे प्रतिक म्हटले आहे.

या बरोबरच महाराष्ट्रातील विरोधीपक्ष नेते देेवेंद्र फडणवीस आणि भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी देखील जागतिक महिला दिनानिमित्त ट्वीट केले आहे.

जगभरातील विविध ठिकाणी स्त्रियांनी त्यांच्या हक्कांसाठी दिलेल्या लढ्यांच्या स्मरणार्थ ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून १९१३-१९१४ पासून पाळण्यात येत आहे. या वर्षी कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या ‘आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत’ ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून पाळला जाण्याचा ठराव करण्यात आला होता.

Exit mobile version