मराठा आरक्षणावरून विधानसभेत भाजपचे नेते कडाडले, विरोधकांची पळापळ!

सत्ताधारी- विरोधक भिडले

मराठा आरक्षणावरून विधानसभेत भाजपचे नेते कडाडले, विरोधकांची पळापळ!

मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणासंदर्भात ठेवण्यात आलेल्या कालच्या बैठकीत विरोधकांनी दांडी मारत बहिष्कार टाकला. यावरून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. एकीकडे आरक्षणावरून सरकार विरोधात घोषणा करायच्या आणि तोडगा काढण्यासाठी आयोजन करण्यात आलेल्या बैठकीला दांड्या मारायच्या, अशा प्रकारची टीका भाजपच्या नेत्यांनी केली. विरोधकांच्या अनुपस्थितीचा मुद्दा आजच्या विधिमंडळाच्या अधिवेशनात देखील गाजला. यावरून बराच वेळ गदारोळ निर्माण झाल्याने विधानसभा सभापतींना काही वेळ सभागृहाचे कामकाज बंद करण्याची वेळ आली.

मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत भाजपच्या नेत्यांनी विरोधकांवर टीका केली. भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील यावर विरोधकांना खडे बोल सुनावले. नितेश राणे म्हणाले की, कालच्या बैठकीत विरोधकांच्या अनुपस्थितीवरून त्यांचे खरे चेहरे समोर आले आहेत. विरोधी पक्ष नेत्यांची भूमिका काय आहे, त्यांना स्वतंत्र आरक्षण पाहिजे? की ओबीसी समजातून पाहिजे?, याबाबत त्यांनी स्पष्ट करावे. एकीकडे त्यांच्यातले लोकप्रतिनिधी स्वतंत्र आरक्षणाची मागणी करतात आणि दुसरीकडे ही लोकं मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळण्याची याठिकाणी मागणी करतात.

भाजप आमदार आशिष शेलार म्हणाले की, बैठकीला येतो म्हणणारे विरोधक अचानक बहिष्कार टाकतात. सभागृहाच्या बाहेर यांचा कोणीतरी बोलावता धनी आहे जो त्यांना सांगतो, बैठकीला येतो म्हणून पण जाऊ नका. समाजाबरोबर एकत्र येण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उबाठा यांची वेगळी भूमिका असते.

हे ही वाचा:

बाप दाखव नाही, तर श्राद्ध कर…. भूमिका घेताच विरोधक पळाले!

मुस्लीम महिलाही पोटगी मागू शकतात

वरळी हिट अँड रन…मिहीर शहा १६ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत

विश्वासघातकी मविआच्या नेत्यांना मराठा समाज माफ करणार नाही!

आमदार अमित साटम म्हणाले की, विरोधकांना दोन्ही समाजाशी काही देणं घेणं नसून यांना फक्त राजकारण करायचे आहे. ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या भूमिकेवर तुमची भूमिका स्पष्ट करावी.

भाजप आमदार राम कदम हे देखील यावेळी आक्रमक झाले. ते म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या मागणी करिता विशेष अधिवेशनाची बोलवण्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी केली होती. त्यानंतर कालच्या बैठकीपूर्वी ते स्वतः म्हणाले होते की याबैठकीमध्ये आरक्षणाचा तोडगा निघेल. मात्र, बैठकीला आले नाहीत. माध्यमांपुढे यांचे मत वेगळं असत आणि दुसरीकडे वेगळं असत. ४० वर्षे सत्तेत असताना मराठा समाजाला आरक्षण देता आले नाही, आरक्षणाला विरोध करणारा काँग्रेसचा नेता होता, असा आरोप देखील आमदार कदम यांनी केला.

Exit mobile version