पश्चिम बंगालमधील विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते सुवेंदू अधिकारी म्हणाले, “येथे हिंदू सण साजरे करण्यासाठी न्यायालयात जावे लागते. आजही खूप हिंसाचार झाला. परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर आहे. आतापर्यंत ३५ पोलिस जखमी झाले आहेत. ममता बॅनर्जी तुष्टीकरणाचे राजकारण करत आहेत. मी यापूर्वी राज्यपालांना पत्र लिहिले होते (बंगालमध्ये केंद्रीय सैन्य तैनात करण्यासाठी), काल मी मुख्यमंत्र्यांनाही आवाहन केले होते. जेव्हा या लोकांनी तसे केले नाही, तेव्हा मी आज न्यायालयात गेलो. उद्या कॉलेज स्क्वेअरवर भाजपची रॅली आहे. वास्तविकता अशी आहे की बंगालमध्ये हिंदू सुरक्षित नाहीत, परिस्थिती खूप गंभीर, नाजूक आहे.” ते पुढे म्हणाले, ‘बंगालमध्ये हिंदू सुरक्षित नाहीत, परिस्थिती आणखी बिकट होणार आहे.’
शनिवारी (१२ एप्रिल) कोलकाता उच्च न्यायालयाने पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात केंद्रीय सशस्त्र दल (CAPF) तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. खरंतर, वक्फ दुरुस्ती कायद्याविरोधात संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये निदर्शने केली जात आहेत. येत्या काळात विविध पक्षांकडून यासंदर्भात रॅली काढण्यात आल्या आहेत. या संदर्भात, मुर्शिदाबादमध्ये हिंसाचार दिसून आला. या संघर्षात तिघांचा मृत्यू झाला आणि आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणात १०० हून अधिक लोकांना अटक केली आहे. या प्रकरणात भाजप नेते शुभेंदु अधिकारी यांनी न्यायालयात धाव घेतली होती.
हे ही वाचा :
बंगालमध्ये बुकी मिथुन चक्रवर्तीची हत्या
चेंबूर येथील गोळीबार प्रकरणात मुख्य शूटर्ससह सूत्रधाराला अटक
तहव्वूरमुळे श्वास कोंडलाय, दाऊदला आणले तर बंदच पडेल…
संदीप शर्मा कोहलीला पुन्हा ‘मामा’ बनवणार!
या प्रकरणाची सुनावणी करताना, न्यायमूर्ती सौमेन सेन यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने मुर्शिदाबादच्या बाधित भागात सामान्य परिस्थिती पुनर्संचयित करण्यासाठी सीएपीएफ तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. शुभेंदू अधिकारी यांच्या याचिकेवर तात्काळ सुनावणीसाठी न्यायमूर्ती सौमेन सेन आणि न्यायमूर्ती राजा बसू चौधरी यांचे विशेष खंडपीठ स्थापन करण्यात आले होते. या याचिकेत शुभेंदू अधिकारी यांनी केंद्रीय दलांची तात्काळ तैनाती करण्याची मागणी केली होती. यावेळी, राज्य सरकारच्या वतीने न्यायालयात उपस्थित असलेल्या वकिलाने सांगितले की, मुर्शिदाबादच्या हिंसाचारग्रस्त भागात बीएसएफच्या ७ कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान, कोर्टाच्या आदेशानंतर आता याठिकाणी सीआरपीएफच्या तुकड्या देखील तैनात होणार आहेत.