26 C
Mumbai
Wednesday, November 13, 2024
घरविशेषऔरंग्याच्या पिलावळीने दुसऱ्यांना शिवद्रोही बोलू नये !

औरंग्याच्या पिलावळीने दुसऱ्यांना शिवद्रोही बोलू नये !

भाजप नेते नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

Google News Follow

Related

मालवणमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्य सरकार विरोधात काल (१ सप्टेंबर) आंदोलन केले. विरोधकांच्या आंदोलनाला भाजपकडूनही आंदोलन करून उत्तर देण्यात आले. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी सरकारवर टीका करत, हे शिवद्रोही सरकार असून त्यांना ‘गेट आऊट ऑफ इंडिया’ केले पाहिजे असे म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या टीकेला भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी उत्तर दिले आहे. औरंग्याच्या पिलावळीने दुसऱ्यांना शिवद्रोही बोलू नये, बाळासाहेब हयात असते तर उध्दव ठाकरेंना लाथ मारून मातोश्री बाहेर काढले असते, अशी खोचक टीका नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

भाजप आमदार नितेश राणे म्हणाले, औरंग्याच्या पिलावळीने दुसऱ्यांना शिवद्रोही बोलू नये. उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा पाकिस्तानच्या झेंडे फडकवले गेले, पाकिस्तानच्या जिंदाबादच्या घोषणा दिल्या गेल्या, हे असे आतापर्यंत कोणत्याही मुख्यमंत्र्यांच्या काळात झाले नाही. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कमी अन पाकिस्तानचे एजंट म्हणून जास्त काम करत होते.

हे ही वाचा : 

बांगलादेशात दुर्गापूजेसाठी बनवण्यात आलेल्या मूर्तीचे विटंबन

निषाद कुमारची २.०४ मीटर ‘उंच उडी’ मारत रौप्य पदकाला गवसणी

टीएमसी प्रवक्त्यांना वृत्तवाहिनांवर जाण्यास मज्जाव

माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला करणारे तिघे ताब्यात

ते पुढे म्हणाले, उद्धव ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेंचे नाव लावायला दिले नसते. बाळासाहेब एक मॅड मॅन हिंदू होते, कडवट हिंदू होते, हिंदुत्वसाठी ते कधीही तडजोड करायचे नाहीत. त्यामुळे आजच्या उद्धव ठाकरेंच्या आणि बाळासाहेबांच्या रक्तामध्ये काहीही संबंध नाही, हे बाळासाहेबांचे रक्त असूच शकणार नाही. जर आज बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना लाथ मारून मातोश्री बाहेर काढून टाकले असते, असे नितेश राणे म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा