तुतारी पक्ष मुस्लीम लीगचा पार्टनर आहे का?

भाजप नेते आमदार नितेश राणेंची टीका अन सवाल

तुतारी पक्ष मुस्लीम लीगचा पार्टनर आहे का?

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते उत्तम जानकर यांनी हिंदू देवतांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी सर्व स्तरावरून त्यांच्यावर टीका होत आहे. उत्तम जानकर यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांनी टीका करत तुतारी पक्ष मुस्लीम लीगचा पार्टनर आहे का?, असा सवाल उपस्थित केला आहे.

उत्तम जानकर पक्षाच्या कार्यक्रमात टीका करताना म्हणाले, साहेबांनी बारामतीमध्ये दीड दिवसांचा गणपती बसवला होता आणि या गणपतीची लोकप्रियता एवढी वाढली होती की, हा गणपती दुध प्यायचा म्हणून महाराष्ट्रभर बोल-बाला झाला होता. ते पुढे म्हणाले, काही दिवसानंतर एक दिवस अशी बातमी आली की, हा गणपती दारू प्यायला, भ्रष्ट झाला. त्यामुळे साहेबांनी या गणपतीचे दीड दिवसात विसर्जन केले.

हे ही वाचा : 

मेहबुबा मुफ्ती यांच्या मुलीने स्वीकारला विधानसभा निवडणुकीतील पराभव?

बांगलादेशात दुर्गा पूजेला सुरुवात, अमेरिकेने हिंदूंच्या संरक्षणाचे केले आवाहन!

पहिल्या दिवशी १५ हजार मुंबईकरांनी केला मेट्रो- ३ भुयारी मार्गावरून प्रवास

स्त्री शक्तीचा जागर: राष्ट्र सेविका केळकर मावशी

यावरून नितेश राणे यांनी टीका करत म्हणाले, देव गणपती बद्दल असे आक्षेपार्ह वक्तव्य केले असेल आणि शरद पवारांसह तुतारीचा कुठलाच नेता आक्षेप घेत नसेल, नुसतेच हसत असतील तर मुस्लीम लीगचे काम तुतारी पक्ष करत आहे का?, याचे स्पष्टीकरण शरद पवार यांच्या पक्षाने दिले पाहिजे, असे नितेश राणे म्हणाले.

Exit mobile version