केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. ममता बॅनर्जी आता बंगालमध्ये त्यांची लोकप्रियता गमावून बसल्या आहेत आणि हारल्या आहेत, त्यामुळे त्या अलोकशाहीवादी भाषा वापरत आहेत आणि संघराज्य रचनेला नुकसान पोहोचवत आहेत. ममता बॅनर्जींची तुलना उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्याशी करत हे दोघेही विरोध सहन करू शकत नसल्याचे त्यांनी म्हटले. तसेच लालू यादव, तेजस्वी यादव आणि राहुल गांधी यांच्यासारख्या नेत्यांना बंगालमध्ये मुलींवर बलात्कारासारखे गुन्हे घडताना दिसत नाहीत. हे नेते ममता बॅनर्जींनाच पाठिंबा देत असल्याचे दिसते, असे मंत्री गिरीराज सिंह म्हणाले. पाटणा विमानतळावर (२९ ऑगस्ट) पत्रकारांशी संवाद साधताना केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह बोलत होते.
मुख्यमंत्री बॅनर्जी या आपल्या पदाचा राजीनामा देणार नसून पंतप्रधान मोदींनी राजीनामा दिला पाहिजे. बंगाल पेटला तर बिहार, ओडिशा, झारखंडही पेटेल, असे मुख्यंत्री बॅनर्जी यांनी वक्तव्य केल्याचे मंत्री गिरीराज सिंह यांना विचारले. यावर ते म्हणाले, ही भाषा कोणत्याही लोकशाहीवादी नेत्याची असू शकत नाही. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री बॅनर्जी यांची तुलना उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्याशी केली, जे लोक आपल्या विरोधकांना सहन करू शकत नाहीत आणि ममता बॅनर्जी देखील त्यांचा विरोध सहन करू शकत नसल्याचे त्यांनी म्हटले.
हे ही वाचा :
ममता म्हणतात, बंगाल पेटले तर दिल्लीही पेटेल!
बृजभूषण यांच्यावर कुस्तीपटूंकडून दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्यास नकार
पुण्यात २२ वर्षी नौशाद चालवत होता बनावट टेलिफोन एक्स्चेंज
शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर सावित्रीबाई फुले विद्यापीठात दोन दिवसांची राष्ट्रीय परिषद
पुण्यात २२ वर्षी नौशाद चालवत होता बनावट टेलिफोन एक्स्चेंज
दरम्यान, कोलकाता प्रशिक्षणार्थी डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरणी भाजपकडून बुधवारी (२८ ऑगस्ट) बंगाल बंदची हाक देण्यात आली होती. यादरम्यान अनेक ठिकाणी जाळपोळ आणि गोळीबाराच्या बातम्या आल्या, त्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची प्रतिक्रिया समोर आली, जर बंगाल जळेल तर आसाम, बिहार, झारखंड, ओडिशा आणि दिल्लीही जळतील, असे मुख्यमंत्री ममता म्हणाल्या.