29 C
Mumbai
Saturday, June 29, 2024
घरविशेषचित्रा वाघ संतापल्या, आव्हाड नाही...हाड हाड!

चित्रा वाघ संतापल्या, आव्हाड नाही…हाड हाड!

जितेंद्र आव्हाड यांच्यावर शाब्दिक प्रहार

Google News Follow

Related

भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर शुक्रवारी जोरदार शाब्दिक प्रहार केला. व्हीडिओच्या माध्यमातून ट्विट करत आव्हाड यांच्यावर त्या बरसल्या. वैयक्तिक टीका खपवून घेणार नाही, असे सुनावताना चित्रा वाघ म्हणाल्या की, राजकीय मुद्द्यांवर बोलता येत नसेल तर तुझे थोबाड बंद कर. माझ्या नादी लागू नको. आव्हाड नाहीस तू हाड हाड आहेस. तीच तुझी लायकी आहे.

 

त्याआधी, पत्रकार परिषदेत आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करताना जितेंद्र आव्हाड यांचा मेंदू त्यांच्या स्वभावाप्रमाणेच सडत चालला आहे, अशी टीका केली होती. त्यावर आव्हाड यांनी चित्रा वाघ यांच्यावर वैयक्तिक टीका केली. मग चित्रा वाघ यांनीही मोठे ट्विट लिहून त्याला सणसणीत प्रत्युत्तर दिले.

 

८ जूनला चित्रा वाघ यांनी आव्हाडांच्या पत्रकार परिषदेचा उल्लेख करत म्हटले होते की, सत्ता काय गेली, सत्तेबरोबर मतीही गेली… आजकाल मविआच्या नेत्यांच्या डोक्यावर इतका परिणाम झालेला दिसतोय की, त्यांचा जीभेवरही ताबा राहिलेला नाही पत्रकार परिषदेत जाहीररित्या शिवीगाळ करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांचा मेंदूही त्यांच्या स्वभावाप्रमाणं सडत चाललाय. अशा विकृतींना वेळीच आवर घाला आणि यांना येरवड्याच्या रूग्णालयात दाखल करा.

 

त्यावर मग आव्हाड यांनीही ट्विट केले आणि वाघ यांच्या ट्विटला उत्तर दिले. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, ताई मी कुठली ही शिवी दिली नाही ….. फक्त मला कोणाची तोंड उघडायला लावू नका … मी तुमची खूप इज्जत करत आलो आहे … तुम्हारे शिशे के घरपे हम पत्थर मार सकते है …. हमाम मै सब नंगे है …….Baपूआर्मस्ट्राँग ….. आठवत असेल ना …ह्या पुढे स्वभावाप्रमाणे वागीन… एंटी चैम्बर … मधले “विनोद”…. आत्ता बस. आपण खूप खालच्या पातळी वार जाऊन बोलता … माझा स्वभाव आपल्याला माहित आहे …मी सहन करतो … पण मला त्यानी बोलावे ज्याचे हात स्वछ आहे …. अजून खूप बोलू शकतो …. बहिणीला संभाळून घेत आलो … पण……

हे ही वाचा:

७५ वर्षांत प्रथमच एसटीचे सारथ्य महिलेकडे

‘अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार’

त्या रेल्वे पोलिसांनी चार महिन्यांत ५३ जणांचे जीव वाचवले!

सकाळी ९ चा भोंगा बंद करा अन्यथा… संजय राऊतांना धमकी   

आव्हाड यांच्या या ट्विटला उत्तर देताना चित्रा वाघ चांगल्याच संतापल्या. त्यांनी लिहिले की, म्हणूनच तुमचा मेंदू सडल्याचं मी बोललेय जितेंद्र आव्हाड. आणि तुम्ही लगेच ते सिद्धही करून दाखवलं. माझ्या राजकीय मुद्द्यांवर तुम्ही वैयक्तिक पातळींवर जाऊन बिनबुडाचे आरोप करून चारित्र्यहनन करताय, तुमच्याकडे जेव्हा उत्तर नसतं तेव्हा स्त्रीची बदनामी हेच तुमचं शस्त्र असतं. मी यापूर्वीही अशा प्रसंगांना सामोरे गेलेय. बहिण म्हणून चारित्र्य हनन करणारी तुमच्या सारखी औलाद महाराष्ट्रात जन्माली आली हेच दुर्देव आहे. माझा राजकीय प्रवास तुमच्यासारखा नाही. तुम्ही जेव्हा ‘कुलू मनाली’ करत होता तेव्हा माझा संघर्ष सुरू होता. परमारच्या आत्महत्येसाठी कोण जबाबदार आणि त्यातून वाचवा म्हणत किती जणांचे किती वेळा पाय धरलेत हे सर्वांना माहिती आहे. तुमच्या बॉडीगार्डची आत्महत्या होती की हत्या केली तुम्ही त्याची ही चौकशी व्हायला हवी. तुमचा पीए कशामुळे तडीपार झाला, हेही लपून राहिलेलं नाही. पण मला तुमच्या वैयक्तिक आयुष्यात जायचं नाहीये तुमच्या बुडाखाली किती अंधार आहे ते पोलिसच बाहेर काढतील. मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी खाणारा गिधाड आहेस तू ..तुमच्यासारख्या गिधाडांना मी सोडणार नाही आणि आत्ताही तुम्हाला पुरून उरणार. खुद को इज्जतदार बोलते हुए इज्जत औरत की उतारते हैं. आपकी तृष्णा कभी तृप्त नहीं होती है.  आप रावणकाल के भूखे और लंघे हैं. आप हमाम के बाहर भी नंगे हैं….

आव्हाड नाहीसचं तू हाड हाड आहेस आणि तीच तुझी लायकी आहे राजकीय मुद्द्यांवर बोलता येत नसेल तर तुझं थोबाड बंद ठेव माझ्या नादी लागू नकोस हे लक्षात ठेव.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
162,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा