भाजप नेते राजीव चंद्रशेखर म्हणाले, मोहनलालचा एंपुरान पाहणार नाही!

चित्रपटात दाखविण्यात आलेल्या गुजरात दंगलीच्या प्रसंगावरून केली टीका

भाजप नेते राजीव चंद्रशेखर म्हणाले, मोहनलालचा एंपुरान पाहणार नाही!

केरळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष राजीव चंद्रशेखर यांनी जाहीर केले की ते सुपरस्टार मोहनलालचा नुकताच प्रदर्शित झालेला मल्याळम चित्रपट ‘एंपुरान’ पाहणार नाहीत. अभिनेता-निर्माता पृथ्वीराज सुकुमारन दिग्दर्शित ‘एंपुरान’ हा २०१९ च्या ब्लॉकबस्टर ‘लूसिफर’ चा बहुप्रतीक्षित सिक्वेल आहे. मात्र, चित्रपटावर वाढणाऱ्या वादाच्या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर त्यांनी चित्रपटातील महत्त्वाच्या बदलांविषयी माहिती मिळाल्यानंतर आपली नाराजी व्यक्त केली. राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले की, निर्मात्यांनी १७ दृश्यांमध्ये बदल करण्यास सहमती दर्शवली असून त्यामुळे चित्रपट पुन्हा सेन्सॉर प्रक्रियेतून गेला आहे.

ते म्हणाले, मी लूसिफर पाहिला होता आणि मला तो आवडला होता. मी एंपुरान पाहण्यास उत्सुक होतो, कारण तो सिक्वेल आहे. मात्र, आता मला समजले आहे की निर्मात्यांनी १७ दृश्यांमध्ये बदल केले आहेत आणि तो पुन्हा सेन्सॉर प्रक्रियेतून गेला आहे. चित्रपटातील कथित ऐतिहासिक विकृतीकरणावर टीका करताना त्यांनी सांगितले, “एक चित्रपट हा केवळ चित्रपट म्हणून पाहिला जावा. तो इतिहास म्हणून स्वीकारला जाऊ शकत नाही. जर कोणताही चित्रपट सत्याला विकृत करून कथा सांगण्याचा प्रयत्न करत असेल, तर तो अपयशी ठरतो.”

हे ही वाचा:

बेंगळुरू-कामाख्या एक्सप्रेसचे ११ डब्बे रुळावरून घसरले

टीम इंडिया मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी करणार ऑस्ट्रेलिया दौरा

अभिनेता मोहनलालने एंपुराण चित्रपटातील ‘गुजरात दंगल’ विषयावरून व्यक्त केली दिलगिरी

पश्चिम बंगाल: मोथाबाडीत तणाव कायम

शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर वाद सुरू झाला. प्रेक्षकांनी काही दृश्यांवर आक्षेप घेतला, ज्यामध्ये कथितरित्या २००२ च्या गुजरात हिंसाचाराचा उल्लेख करण्यात आला होता.

दरम्यान, वक्फ सुधारणा विधेयकावर विरोधकांच्या आक्षेपांवरही राजीव चंद्रशेखर यांनी भाष्य केले.

ते म्हणाले, “इंडी आघाडीत (INDI Alliance) असलेले नेते, मग ते ओवैसी असोत किंवा राहुल गांधी, हे केवळ एका समाजाला दिशाभूल करण्याचे काम करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सादर केलेला वक्फ सुधारणा कायदा कोणाच्या विरोधात नाही.”

त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “केरळमध्ये शेकडो कुटुंबे आहेत, ज्यांची जमीन आणि मालमत्ता वक्फ मंडळ एकतर्फी हडप करत आहे. वक्फ सुधारणा विधेयक अशा प्रकारच्या अन्यायकारक कारवायांना आळा घालेल.”

याशिवाय, केरळ कॅथोलिक बिशप कौन्सिलने देखील या विधेयकाला पाठिंबा दिला आहे, असे चंद्रशेखर यांनी सांगितले. त्यांनी सर्व खासदारांना, काँग्रेसच्या नेत्यांसह, विनंती केली की “हा कायदा संविधानाच्या चौकटीत राहील आणि लोकांना भेडसावणाऱ्या खऱ्या समस्यांचे निराकरण करेल याची खात्री करावी.”

Exit mobile version