भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्री श्रीमती सरस्वती बच्चू पाटील यांचे कोल्हापूर येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, दोन मुली असा त्यांचा परिवार आहे. या घटनेनंतर चंद्रकांत पाटील यांची भेट घेण्यासाठी आज, २५ जुलैला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूरला रवाना होणार आहेत.
चंद्रकांत पाटील यांच्या आईचे ९१ व्या वर्षी रविवार, २४ जुलै रोजी निधन झाले. काल सांयकाळी साडेआठ वाजता कोल्हापूर येथील पंचगंगा स्मशानभूमी येथे सरस्वती पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. चंद्रकांत पाटील यांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे हे आज,२५ जुलैला नवी दिल्लीहून कोल्हापूरला जाणार आहेत. आज दुपारी २ वाजता मुख्यमंत्री विमानाने कोल्हापूरकडे प्रयाण करतील.
माझी आई सरस्वती (वय ९१) आज देवाघरी गेली. वृद्धापकाळामुळे प्रकृती खाली-वर होत होतीच. प्रतिकूल परिस्थितीतही संसार करताना आईने आम्हा भावंडांवर स्वाभिमान आणि मेहनतीनं जगायचे संस्कार केले. या शिदोरीवरच माझी आयुष्यभर वाटचाल झाली आहे.
आई, देवाघरूनही तुझं आमच्यावर लक्ष असेलच..
ओम शांती! pic.twitter.com/0LV6b8eQHD— Chandrakant Patil (@ChDadaPatil) July 24, 2022
आईच्या निधनानंतर चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करून याबद्दल शोक व्यक्त केला आहे. ” माझी आई सरस्वती (वय ९१) आज देवाघरी गेली. वृद्धापकाळामुळे प्रकृती खाली-वर होत होतीच. प्रतिकूल परिस्थितीतही संसार करताना आईने आम्हा भावंडांवर स्वाभिमान आणि मेहनतीनं जगायचे संस्कार केले. या शिदोरीवरच माझी आयुष्यभर वाटचाल झाली आहे. आई, देवाघरूनही तुझं आमच्यावर लक्ष असेलच.. ओम शांती! असं ट्विट पाटील यांनी केले आहे.
हे ही वाचा:
पुण्यात शिकाऊ विमान शेतात कोसळलं, पायलट जखमी
“आदिवासी मुलगी देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदापर्यंत पोहचते हे लोकशाहीचे सामर्थ्य”
मै द्रौपदी मुर्मू….. देशाच्या १५ व्या राष्ट्रपतींनी घेतली शपथ!
ऑगस्ट महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद!
चंद्रकांत पाटील यांची रविवारी भाजपाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत बैठक होती. त्यासाठी चंद्रकांत पाटील हे रविवारी दुपारी कोल्हापुरला गेले होते. त्यापूर्वी करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी मंदिरात गेले होते. मात्र बैठकीला जाण्यापूर्वी आपण आईंना भेटून येतो असे चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. त्यानंतर ते आईला भेटण्यासाठी संभाजीनगर येथील निवासस्थानी गेले. आईला भेटल्यानंतर ते कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी निघतानाच त्यांच्या मातोश्रींनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे कोल्हापुरात हळहळ व्यक्त होत आहे.