छत्रपती शिवरायांचा पुतळ्या कोसळल्या प्रकरणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकार विरोधात ‘जोडो मारो’ आंदोलन केले. यावेळी मविआमधील सर्व घटक पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींनी मागितलेल्या माफीनामाचा उल्लेख करत त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर मग्रुरी असल्याचे सांगितले. उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर भाजप नेते आशिष शेलार म्हणाले की, ‘अहंकाराचा महामेरू, मग्रुरीचा कैवारी ही उद्धव ठाकरेंची प्रतिमा’ आहे.
भाजप नेते आशिष शेलार म्हणाले की, ‘अहंकाराचा महामेरू, मग्रुरीचा कैवारी ही उद्धव ठाकरेंची प्रतिमा’ आहे. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात सपशेल मागितलेल्या माफिमध्ये मग्रुरी बघणारे उद्धव ठाकरे यांनी आरशामध्ये स्वतःचा चेहरा बघितला असावा, असे आशिष शेलार म्हणाले.
हे ही वाचा :
विद्यार्थ्यांना पारंपारिक वेशभूषा, वस्तू वापरावर बंदी आणल्यास होणार कारवाई
२२ जणांसह बेपत्ता झालेल्या रशियन हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले, १७ मृतदेहही ताब्यात !
राज्यपालांच्या हस्ते ५० युवा नादस्वरम वादकांना शिष्यवृत्ती प्रदान
कंटेनर चालकाचे हातपाय बांधले आणि चक्क ‘ऍपल’ फोन पळवले !
उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही टीका केली. नेहरूंनी स्वतःच्या पुस्तकात शिवरायांबद्दल केलेल्या लिखाणावर कॉंग्रेसला माफी मागायला लावणार का?, असा सवाल उद्धव ठाकरेंना केला. तसेच मध्यप्रदेशाच्या घटनेवर शरद पवार, उद्धव ठाकरेंचे मौन का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, मविआकडून आज राज्यभर आंदोलन करण्यात आले. तर विरोधकांच्या आंदोलनाला विरोध दर्शवत भाजपकडूनही राज्यभर आंदोलन करण्यात आले.