महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानुसार राज्यातील सर्व पक्ष कामाला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटाने नवीन गाणे देखील लाँच केले आहे. ‘मशाल हाती दे’ असे या गाण्याचे बोल आहेत. दरम्यान, उबाठा गटाच्या गाण्यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी टीका केली आहे.
भाजप नेते आशिष शेलार ट्वीटकरत म्हणाले, गाणं असं असायला हवं होतं! उतलो माय… मातलो गं माय.. घेतला वसा टाकला गे माय… गणपतीची आरती हातात घेतली नव्हती, पांडूरंगाची तुळसी माळ गळ्यात घातली नव्हती, पंढरपूरात जाणारी वारकऱ्यांची वारी रोखली होती, लालबागच्या राजाची परंपरा राखली नव्हती.
ते पुढे म्हणाले, हे कुलस्वामिनी एकवीरा आई मुख्यमंत्री झाल्यावर..तुझी पायरी सुध्दा दुरुस्त केली नव्हती, अहंकाराच्या दैत्याने घेरले होते माय… सत्ता गेली… पक्ष गेला, चिन्ह गेले. तुझा कोप झाला गं माय.. आता जाग आली माय म्हणून म्हणतो.. दार उघड बये… दार उघड… माझ्यातील अहंकाराला जाळण्यासाठी सत्वरी भूवरी ये.. अंबे उदो.. उदो..उदो.., असे आशिष शेलार म्हणाले.
हे ही वाचा :
नसरल्लाच्या मुलीनंतर इस्रायलने जावयालाही उडवले!
‘देवा इस्रायलला शक्ती दे, जेणेकरून सर्व नसरल्लांचा खात्मा होवो’
राहुल गांधींचे मोहब्बत की दुकान ड्रग्ज विकते
एसबीआयच्या बनावट शाखेने गावकऱ्यांना फसवले
गाणं असं असायला हवं होतं !@Shivsenaofc @BJP4Maharashtra @BJP4Mumbai pic.twitter.com/Q6fCf0Bwpz
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 3, 2024