लोकसभेचा नुकताच निकाल लागला आणि देशात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला.देशात एनडीएचेच सरकार स्थापन होणार आहे.परंतु भाजपला बहुतांचा आकडा गाठता आलेला नाही.त्यामुळे विरोधक तर्क-वितर्क लावून देशात मोदींचे सरकार स्थापन होणार नसल्याची निरर्थक बडबड करत आहेत.विरोधकांच्या या तर्क-वितर्कावर भाजप नेते आशिष शेलार यांनी व्यक्तव्य केले आहे.विरोधक देव पाण्यात घालून बसले आहेत, पण जनतेचा कौल एनडीएच्या बाजूने असल्याने देशात पुन्हा मोदींचेच सरकार येणार असल्याचे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
४ जूनला लागलेल्या लोकसभेच्या निकालात एनडीएला २९३ यामध्ये भाजपाला २४० जागा मिळाल्या.तर विरोधकांच्या इंडी आघाडीला २३४ जागा मिळाल्या.विरोधकांच्या ‘इंडी’ आघाडीपेक्षा ‘एनडीए’ अव्वल ठरला.यामध्ये एकट्या भाजपला २४० जागा मिळाल्या.त्यानुसार देशात नंबर एक रँकचा पक्ष असेल तर तो भाजप आहे.येणाऱ्या दोन दिवसात मोदी पंतप्रधान पदाची शपध घेऊन तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहेत.परंतु, भाजपला बहुमताचा आकडा पार करता आला नसल्याने विरोधक टीका करत आहेत आणि मोदींचे सरकार तिसऱ्यांदा येणार नसल्याचे वायफळ बडबड करत आहेत.
हे ही वाचा:
रोहित, हार्दिकच्या खेळीमुळे आयर्लंडवर सफाईदार विजय!
एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहणार
युगांडाच्या ४३ वर्षीय गोलंदाजाने रचला इतिहास
यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी चांगलेच सुनावले आहे.मोदींचे सरकार तिसऱ्यांदा आले तरी ते टिकणार नसल्याचे विरोधक बोलत आहेत,असा प्रश्न त्यांना विचारला असता.यावर आशिष शेलार म्हणाले की, स्वप्न बघणाऱ्यांना काहीच अडचण नाही.त्यांनी देव पाण्यात टाकून बसले असले तरी जनतेचा कौल एनडीएच्या बाजूने असल्यामुळे त्यांना पुढची पाच वर्ष विरोधात बसायचंय हे त्यांना माहित आहे.