27.7 C
Mumbai
Saturday, April 12, 2025
घरविशेष"गोधडी ओली करत होतात" तेव्हा भाजप आणि देवेंद्रजी राम मंदिरासाठी कारसेवा करत...

“गोधडी ओली करत होतात” तेव्हा भाजप आणि देवेंद्रजी राम मंदिरासाठी कारसेवा करत होते!

भाजपचे नेते, मंत्री नितेश राणे यांचं संजय राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर

Google News Follow

Related

देवेंद्रजी फडणवीस आणि भाजपला हिंदुत्व शिकवायची संजय राजाराम राऊत यांची लायकी नाही. ज्यांनी ३७० हटवलं, राम मंदिर उभारलं, समान नागरिक कायद्याकडे पाऊल टाकलं, त्या पक्षाला तुम्ही काय हिंदुत्व शिकवणार?, असा सवाल भाजपा मंत्री नितेश राणे यांनी उबाठा नेते संजय राऊत यांना विचारला आहे. तसेच ठाकरे गटाने हिंदुत्वाचा “पीळ” सोडून दिला आहे, आणि आता काँग्रेसच्या अजेंड्यावर हिंदुत्वाशी लबाडी करत आहे, असा टोला मंत्री नितेश राणे यांनी लगावला.

लोकसभेत आज (२ एप्रिल) वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार आहे. या विधेयकाला सुरवातीपासूनच इंडी आघाडीचे नेते विरोध करत आहेत. संपूर्ण देशाचे या विधेयाकाकडे लक्ष लागून आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल एक ट्वीटकरत वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या बाजूने उद्धव ठाकरेंची सेना काय करेल?, असा सवाल उपस्थित केला होता. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, वक्फ सुधारणा विधेयक उद्या संसदेत,  बघू या उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना, हिंदूहृदयसम्राट, वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार राखणार की राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करीत राहणार?, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते.

मुख्यमंत्र्यांच्या या ट्वीटवर संजय राऊत यांनी ट्वीटकरत प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, देवेंद्र जी, वक़्फ़ सुधारणा विधेयक आणि हिंदुत्ववाचा काडीमात्र संबध नाही, ही तुमच्या पक्षाची एक खाज आहे गोंधळ निर्माण करण्याची! विषय राहुल गांधींचा , त्यांच्या आजीने अमेरिकेला दम भरला होता; आणि पाकिस्तानचे दोन तुकडे करून फाळणीचा बदला घेतला होता! तुमच्यात हा दम आहे? बोला, असे संजय राऊत यांनी म्हटले.

हे ही वाचा : 

कुणाल कामरा हाजीर हो! मुंबई पोलिसांनी बजावले तिसरे समन्स

मुगल, चंगेज खान, औरंगजेब, बाबर, तैमूर ही नावे कशासाठी ?

प्रधानमंत्री मुद्रा योजनेने महिला कशा बनल्या सक्षम

… म्हणून दिशा सालीयन प्रकरण दुसऱ्या खंडपीठाकडे नेले जाण्याची शक्यता!

संजय राऊत यांच्या ट्वीटवर भाजपा मंत्री नितेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, थोडीशी लाज असेल तर राऊतांनी औरंगझेब फॅन क्लबचे म्होरक्या आणि आपला मालक उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाच्या दोन गोष्टी सांगाव्यात. भाजपला “मिशा फुटल्या नव्हत्या” म्हणणाऱ्या संजय राऊतांनी हे लक्षात ठेवावं की तुम्ही “गोधडी ओली करत होतात” तेव्हा भाजप आणि देवेंद्रजी राम मंदिरासाठी कारसेवा करत होते.

आजचा उबाठा गट म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पायाशी लोटांगण घालणारी आणि वक्फ बोर्डाचं समर्थन करणारी हिरवीसेना झाली आहे. ठाकरे गटानं हिंदुत्वाचा “पीळ” सोडून दिला आहे, आणि आता काँग्रेसच्या अजेंड्यावर हिंदुत्वाशी लबाडी करत आहे.

राम आणि कृष्ण आले आणि गेले असं संजय राजाराम राऊत म्हणाले पण आजही हिंदू प्रभू राम आणि श्रीकृष्णांवर श्रद्धा ठेवून आहे. तुम्ही जनाबी परंपरा पाळायला सुरूवात केल्यामुळे राम आणि कृष्ण तुम्हाला कळणार नाहीत. महाराष्ट्रातील जनता सगळी सत्य परिस्थिती पाहत आहे. संजय राऊत कितीही वटवट केली तरी लोकांना आता मूर्ख बनवता येणार नाही, असे मंत्री नितेश राणे म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
241,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा