भाजपला २० हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या देणग्यांद्वारे ७२० कोटी मिळाले!

सन २०२१-२२च्या तुलनेत सन २०२२-२३मध्ये १७.१ टक्के वाढ

भाजपला २० हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या देणग्यांद्वारे ७२० कोटी मिळाले!

सन २०२२-२३मध्ये २० हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या देणग्यांद्वारे भाजपला ७२० कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. सन २०२१-२२च्या तुलनेत त्यांच्या प्राप्तीमध्ये १७.१ टक्के वाढ झाली आहे. तर, काँग्रेसला वैयक्तिक, कॉर्पोरेट आणि निवडणूक रोख्यांच्या स्वरूपात मिळणाऱ्या देणग्यांमध्ये १६.३ टक्के घट झाली आहे. त्यांना सन २०२१-२२मध्ये ९५.४ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या होत्या. सन २०२२-२३मध्ये काँग्रेसला अवघे ७९.९ कोटी रुपये देणगीरूपात मिळाले आहेत.

विविध राजकीय पक्षांनी सन २०२२-२३मधील त्यांना मिळालेल्या देणग्यांचे अहवाल सादर केले. त्यानुसार, निवडणूक आयोगाने सोमवारी याबाबतची माहिती सार्वजनिकरीत्या खुली गेली. भाजपला ७१९ कोटी ८० लाखांच्या देणग्या मिळाल्या आहेत. सन २०२१-२२मध्ये पक्षाला ६१४ कोटी ५० लाख देणगीरूपात मिळाले होते. त्यातील प्रुडेंट इलेक्ट्रोरल ट्रस्टचा वाटा २५४ कोटी ७० लाखांचा म्हणजे तब्बल ३५ टक्के आहे. तर, इंझिगार्टिग इलेक्ट्रोरल ट्रस्टने आठ लाखांच्या देणग्या दिल्या आहेत.

हे ही वाचा:

शार्कने घेतला महिलेच्या पायाचा घास; पाच वर्षांच्या मुलीसमोर मातेचा मृत्यू!

अमली पदार्थ विरोधी पथकाकडून वर्षभरात ४८ कोटींचा अमली पदार्थ जप्त

द. आफ्रिकेच्या संघाची घोषणा; टेंबा बावुमाला कर्णधारपदावरून हटवले

नौदल अधिकाऱ्यांच्या सन्मानचिन्हांत आता शिवाजी महाराजांचे प्रतिबिंब

पक्षांना दरवर्षी वार्षिक लेखापरीक्षण अहवाल सादर करावा लागतो, मात्र त्यात निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून मिळणाऱ्या देणग्यांची नोंद करण्याचे बंधन राजकीय पक्षांवर नाही. सन २०२२-२३चा सर्व राष्ट्रीय पक्षांचा वार्षिक लेखापरीक्षण अहवाल अद्याप सादर झालेला नाही.काँग्रेसला मिळणाऱ्या देणग्यांमध्ये सुमारे १५ कोटींहून अधिक घट झाली आहे. काँग्रेसला मिळणाऱ्या देणग्यांचे प्रमाण हे भारत राष्ट्र समितीसारख्या प्रादेशिक पक्षांपेक्षाही कमी आहे. बीआरएसला सन २०२२-२३मध्ये २० हजारांपेक्षा अधिक रकमेच्या १५४ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या.

त्यातील ५२९ कोटी रुपये हे निवडणूक रोख्यांच्या स्वरूपातील आहेत. आपने ३७.१ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्याचे जाहीर केले आहे. यात २.९ टक्के घट झाली आहे. त्याच्या आदल्या वर्षी ‘आप’ला ३८.२ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या होत्या.माकपला मिळणाऱ्या देणग्यांतही तब्बल ४० टक्के घट झाली आहे. सन २०२२मध्ये माकपला अवघे सहा कोटी रुपये मिळाले आहेत. सन २०२१-२२मध्ये माकपला १० कोटींहून अधिक रकमेच्या देणग्या मिळाल्या होत्या. तर, माजी लोकसभाध्यक्ष पी. ए. संगमा यांच्या नॅशनल पीपल्स पार्टीने ७.४ कोटी रुपये देणग्या मिळाल्याचे घोषित केले आहे. सन २०२१-२२च्या तुलनेत त्यांना मिळालेल्या देणगीत ३५ लाखांची वाढ झाली आहे.

Exit mobile version