भाजपचे उद्या पुण्यात महाअधिवेशन

अमित शहा यांची उपस्थिती, चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

भाजपचे उद्या पुण्यात महाअधिवेशन

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे येथे भारतीय जनता पक्षाचे महाअधिवेशन उद्या रविवार, २१ रोजी होणार आहे. या अधिवेशनात सुमारे ५ हजार ३०० पदाधिकारी सहभागी होणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज वार्ताहर परिषदेत दिली. यावेळी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे उपस्थित होते.

बावनकुळे म्हणाले, या अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे राज्य सरकारचा अर्थसंकल्प, राज्यातील राजकीय परिस्थिती, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा आलेले सरकार या विषयावर चर्चा करणार आहेत. आमदार आशिष शेलार हे सरकारच्या अभिनंदनाचा ठराव मांडतील. पहिल्या सत्राचा समारोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी करतील. दुपारी २ वाजता शिवप्रकाश हे संघटनात्मक कार्य, ९७ हजार बूथपर्यंतचा पुढचा कार्यक्रम या विषयावर बोलणार आहेत. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्य सरकारने समाजातील सर्व घटकांसाठी सुरु केलेल्या कल्याणकारी योजना याची सविस्तर मांडणी करणार आहेत.

हेही वाचा..

मराठा आरक्षणाकरिता जालन्यात मनोज जरांगेंचे पुन्हा उपोषण सुरु !

पोलिसांनी उद्ध्वस्त केले सेक्स रॅकेट, शेजारच्या मुलींनाच गुंतवले

दुपारी २.५० वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भाषणाने या महाअधिवेशनाचा समारोप होणार आहे. यातून ५ हजर ३०० कार्यकर्ते हे गावागावात जाऊन राज्य सरकारची कामे घरोघरी पोहोचवतील. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेवर येण्यासाठी कार्यकर्ते कामाला लागतील, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.

Exit mobile version