ज्या महिलेला शाहजहान शेखने दिल्या जखमा ती लढवणार लोकसभा निवडणूक!

भाजपने दिली उमेदवारी

ज्या महिलेला शाहजहान शेखने दिल्या जखमा ती लढवणार लोकसभा निवडणूक!

पश्चिम बंगालच्या बसीरहाट लोकसभा जागेवर भाजपने रेखा पत्रा यांना उमेदवारी दिली आहे.अनेक दिवसांपासून चर्चेत असणारे संदेशाखाली प्रकरण हे या विभागातच येते.रेखा पात्रा या महिलांपैकी एक आहेत ज्यांनी टीएमसी ननेते शाहजहान शेख याच्या गैरकृत्याचा पर्दाफाश केला. संदेशाखाली चळवळीतील त्या मुख्य चेहरा होत्या.रेखा पात्रा यांनी शाहजहानवर जमीन बळकावल्याचा आणि लैंगिक छळाचा आरोप केला होता.दरम्यान, या प्रकरणी शाहजहान शेखसह १४ हुन अधिक जणांना अटक करण्यात आली आहे.

रेखा पात्रा यांचा सामना तृणमूल काँग्रेसच्या हाजी नुरुल इस्लाम यांच्याशी होणार आहे. रेखा पात्रा या संदेशाखाली येथील पत्रा पारा भागातील रहिवासी आहेत. शेख शाहजहान आणि त्याच्या साथीदारांच्या विरोधादरम्यान त्यांनी आवाज उठवला आहे. रेखा पात्रा यांनी शेख शाहजहानचे दोन सहकारी शिबू हाजरा आणि उत्तम सरदार यांच्या विरोधात लेखी तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनंतर संदेशाखाली पोलिस ठाण्यात शिबू हाजरा आणि उत्तम सरदार यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आणि त्या दोघांनाही पश्चिम बंगाल पोलिसांनी फेब्रुवारीमध्ये अटक करण्यात आली.

हे ही वाचा:

लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसला धक्का

भाजपच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील तीन उमेदवार

गदारोळानंतर काँग्रेसकडून सुनील शर्मा यांची उमेदवारी मागे!

भाजपने वरुण गांधी यांचे नाव वगळले; आई मनेका गांधी यांची जागा कायम!

लोकसभेचे तिकीट मिळाल्यानंतर रेखा पात्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आणि गावातील महिलांच्या नेहमीच पाठीशी उभे राहीन अशी ग्वाही दिली.दरम्यान, भाजपने पश्चिम बंगालमधील ४२ जागांपैकी ३८ जागांसाठी उमेदवारी जाहीर केली आहे.

Exit mobile version