21 C
Mumbai
Tuesday, January 7, 2025
घरविशेषविरार वसई भागात धर्मांतर करणाऱ्यांचा पर्दाफाश !

विरार वसई भागात धर्मांतर करणाऱ्यांचा पर्दाफाश !

भाड्याच्या गाळ्यात शिकवले जात होते धर्मांतराचे धडे

Google News Follow

Related

वसई विरार येथील मानवेल पाडा भागात धर्मांतर करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.भाड्याने घेतलेल्या एका गाळ्यात धर्मांतराचे धडे देत असल्याची माहिती मिळताच भारतीय जनता पार्टीचे वसई विरार जिल्हा सहसंयोजक विकास देशपांडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन धर्मांतराचा चाललेला खेळ उघडा पाडला आहे.

महाराष्ट्रामध्ये धर्मांतराचे प्रकार अनेक घडत आहेत. याला आळा बसण्यासाठी आणि पुन्हा अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत कारवाई केली जाते.तशीच एक घटना वसई विरार येथे घडली.भारतीय जनता पार्टीचे सहसंयोजक विकास देशपांडे यांनी हा प्रकार उघडकीस आणला.काही दिवसापासून विरार येथील कारगिल नगर मानवेल पाडा येथे क्लासेस च्या नावाने भाड्याने घेतलेल्या गाळ्यात एका धर्माचे प्रार्थना केंद्र चालू असल्याची माहिती विकास देशपांडे यांना मिळाली.त्यानंतर देशपांडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता एक व्यक्ती अनेक महिला-पुरुषांना धर्मांतराचे असल्याचे आढळून आले.

हे ही वाचा:

बलात्कारी, मारेकरी मुलाविरुद्ध आईनेच साक्ष दिली; झाली जन्मठेपेची शिक्षा

‘वंदे भारत’ चीन सीमेपर्यंत धावणार

पवईत एअर होस्टेसची हत्या; फ्लॅटमध्ये मिळाला मृतदेह, एकाला अटक

६८व्या वर्षी प्रख्यात वकील हरीश साळवे तिसऱ्या विवाहबंधनात

त्या ठिकाणी काही पुरुष आणि तब्बल १५च्या वर महिला उपस्थित होत्या.उपस्थित महिलांना या ठिकाणी काय करत असल्याचे विचारल्यास आम्ही प्रार्थना करत असल्याचे महिलांनी सांगितले, तर अनेकांनी बोलण्यास नकार दिला.आपण याठिकाणी प्रार्थना करत आहात, तर आपल्याकडे महानगरपालिकेची परवानगी आहे का ? असे उपस्थित असणाऱ्या ग्रॅबेल नामक व्यक्तीस देशपांडे यांनी विचारले, मात्र त्याच्याकडून काहीच उत्तर मिळाले नाही.देशपांडे यांनी संपूर्ण चौकशी करत धर्मांतर करणाऱ्यांचा पर्दाफाश केला आहे.या या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ देशपांडे यांनी काढून सोशल मीडियावर शेअर केला असून पोलिसांच्या कारवाईबाबत अद्याप कोणतीही माहिती आलेली नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा