यामिनी जाधवांच्या बुरखा वाटण्यावर भाजप सहमत नाही !

भाजप नेते आशिष शेलार यांच वक्तव्य

यामिनी जाधवांच्या बुरखा वाटण्यावर भाजप सहमत नाही !

शिवसेना शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांच्याकडून आज (१२ सप्टेंबर) भायखळ्यात बुरखा वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात मुस्लीम महिलांना बुरखा वाटप करण्यात आले. दरम्यान, यामिनी जाधवांच्या बुरखा वाटप कार्यक्रमावर भाजपने आक्षेप घेतला आहे. या बुरखा वाटपाच्या कार्यक्रमाशी भाजप सहमत नसल्याचे भाजप नेते आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

भायखळ्यातील बुरखा वाटपाच्या कार्यक्रमात यामिनी जाधव स्वतः उपस्थित होत्या. त्यांच्याकडून यावेळी मोठ्या प्रमाणात बुरखा वाटप करण्यात आले. मोठ्या प्रमाणात मुस्लीम महिला कार्यक्रमाला उपस्थित होत्या. या कार्यक्रमावरून भाजपने संताप व्यक्त केला आहे. भाजप नेते आशिष शेलार म्हणाले की, आम्हाला हे मान्य नाही. मला या विषयी पूर्ण माहिती नाही, पण तरीपण अशा पद्धतीचे वाटपाचे कार्यक्रम तेही बुरखा वाटपाचे, भाजप याच्याशी सहमत नाही.

ते पुढे म्हणाले, त्यांची भूमिका, त्यांच्या पक्षाची भूमिका, मतदार संघाच्या आवश्यक्यतेवर त्यांनी मत प्रदर्शित करावे. भारतीय जनता पक्षाला अशा पद्धतीचे कार्यक्रम आयोजित करणे हे मान्य नाही, असे आशिष शेलार म्हणाले.

हे ही वाचा :

मुस्लिमबहुल ताजिकिस्तानमध्ये हिजाब बंदी; पुरुषांना दाढी ठेवण्यास मनाई

‘काँग्रेसचे पंतप्रधान इफ्तार पार्टी देत असत आणि सरन्यायाधीश तिथे जात, त्याचे काय?’

अल्लाउद्दीनचा चिराग घासण्यासाठी उद्धव ठाकरे सज्ज

पॅरालिम्पिक पदकविजेत्या अवनीने पंतप्रधान मोदींना दिली भेट !

 

Exit mobile version