भाजपाने पक्ष फोडलेच नाहीत, ठाकरेंनी काँग्रेसशी हातमिळवणी करताच पक्षाने उठाव केला!

भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांच वक्तव्य

भाजपाने पक्ष फोडलेच नाहीत, ठाकरेंनी काँग्रेसशी हातमिळवणी करताच पक्षाने उठाव केला!

भाजपा नेते आणि कांदिवली पूर्व मतदारसंघाचे उमेदवार अतुल भातखळकर यांनी फोडा-फोडीच्या राजकारणावर मोठ वक्तव्य केले आहे. शिवसेना-राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना फोडून भाजपा सत्तेत असल्याचे सर्व ठिकाणी बोलले जाते. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याचा संदर्भ प्रत्येकी वेळी दिला जातो. ‘सत्तेत आलो पण दोन पक्षांना फोडून आलो,’ असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते. मात्र, भाजपाने कोणताच पक्ष फोडले नसल्याचे अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे. मुंबई तक वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अतुल भातखळकर बोलत होते.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या पक्ष फोडीच्या वक्तव्याचा संदर्भ देत अतुल भातखळकर यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना अतुल भातखळकर म्हणाले, २०१९ मध्ये भाजपा-शिवसेनाने एकत्र निवडणुका लढवल्या होत्या. चार सभांमध्ये पंतप्रधान मोदींपासून सर्वांनी सांगितले की देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील. जनतेचा त्यांनी विश्वासघात केला, महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला बहुमत दिले.

हे ही वाचा : 

हैद्राबादच्या निजामाचे अत्याचार, कुटूंबाचा त्याग खर्गे मतांसाठी विसरून गेले!

महाराष्ट्रात १९९५ नंतर हे प्रथमच घडते आहे…

निवडून येण्याचे आव्हान वाटत नाही, पाय जमिनीवरच, लोकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे विजय निश्चित!

उद्धव ठाकरे म्हणाले, मोदी देशाचे पंतप्रधान त्यांनी मविआचाही प्रचार करावा!

जनतेशी विश्वातघात करून त्यांनी काँग्रेससोबत सरकार स्थापन केले. यानंतर त्यांच्या पक्षाने उठाव केला आणि ते आमच्यासोबत आले, यामध्ये तोड-फोडीचा मुद्दा काय?, कोणता पक्ष फोडला आम्ही?, असा सवाल भातखळकर यांनी उपस्थित केला.

ते पुढे म्हणाले, आम्ही कोणताच पक्ष फोडला नाही. २०१७-१९ पासून शरद पवार स्वतः भाजपामध्ये येण्याचे कसे प्रयत्न करत होते, हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर जाहीरपणे सांगितले आहे. त्यांच्यापक्षाने तो निर्णय घेतला आहे, तोडफोड केली नाही. कारण भाजपा आणि शिवसेनेची नैसर्गिक युती होतीच.

 

Exit mobile version