केरळमध्ये भाजपाने उघडले खाते!

सीपीआयचे व्हीएस सुनील कुमार यांचा पराभव

केरळमध्ये भाजपाने उघडले खाते!

केरळच्या त्रिशूर लोकसभा जागेवर भाजपचे उमेदवार सुरेश गोपी यांनी मोठा विजय मिळवला आहे. या निवडणुकीत सुरेश गोपी यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी सीपीआयचे व्हीएस सुनील कुमार यांचा ७४६८९ मतांनी पराभव केला आहे.विशेष म्हणजे सुरेश गोपी यांच्या विजयाने भाजपने केरळमध्ये इतिहासात प्रथमच आपले खाते उघडले आहे.

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, त्रिशूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सुरेश गोपी यांना ४ लाख १२ हजार ३३८ मते मिळाली आहेत. तर प्रतिस्पर्धी सीपीआयचे उमेदवार व्हीएस सुनील कुमार यांना ३ लाख ३७ हजार ६५२ मते मिळाली आहेत.तसेच काँग्रेसचे मुरलीधरन तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांना ३,२८,१२४ मते मिळाली.

हे ही वाचा:

अबब…अमित शहांचे लीड ७ लाखावर !

देशात एनडीएचीच सत्ता येणार

मंडीच्या गादीवर ‘क्विन’च! कंगना रनौतकडून काँग्रेसच्या विक्रमादित्य सिंह यांचा परभव

नरेश म्हस्के ठरले जायंट किलर, ठाण्यात राजन विचारेंना पाडले

त्रिशूर लोकसभा जागेवरील सुरेश गोपी यांचा हा विजय भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या लोकसभा निवडणुकीपूर्वी सुरेश गोपी यांचा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आणि त्यानंतर २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत त्रिशूरमधून पराभव झाला होता.त्यामुळे या निवडणुकीत कोणाचा विजय होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.अखेर जनतेने सुरेश गोपी यांना साथ देत विजयी केलं आहे.

Exit mobile version