मुंबई महापालिकेने केलेले अनेक दावे हे तथ्यहीन निघाले. त्यातलाच एक दावा म्हणजे नालेसफाईचा. नालेसफाईच्या कामात महापालिकेने नेहमीप्रमाणे टक्केवारीच्या गणितांनाच प्राधान्य दिले. १०७ टक्के नालेसफाई झाल्याचा महापौर किशोरी पेडणेकर यांचा दावा सपशेल फेल ठरला. नालेसफाईचे काम न झाल्याने पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाली. भाजपच्या नगरसेवकांनी ही यादीच महापौर बाईंना नजराणा म्हणून सादर केलेली आहे. महापौरांचे पोकळ दावे यातून अगदी स्पष्टपणे उघड झालेले आहेत.
भाजपने नगरसेवकांकडून आता नालेसफाई न झाल्याची यादीच मागवली. त्यानंतर तब्बल २८ नगरसेवकांनी त्यांच्या विभागात काहीच नालेसफाई न झाल्याचे समोर आणले. प्रशासनाच्या या फोल दाव्यामुळे मुंबईतील अनेक भागातील नालेसफाई ही झालीच नाही हे आता सत्य बाहेर आलेले आहे.
हे ही वाचा:
मुंबईत निर्बंध शिथील करा, व्यापाऱ्यांची ठाकरे सरकारकडे मागणी
‘फ्लाईंग सिख’ ने घेतला जगाचा निरोप
लसीकरण बोगस की बेकायदेशीर ? पाच जणांना अटक
‘चितळे बंधू मिठाईवाले’ यांच्याकडे खंडणी मागणाऱ्या टोळक्याला अटक
महापौर महोदया, आयुक्त महोदय आता तरी जागे व्हा आणि नालेसफाई करा! असे भाजपचे महापालिका गटनेते प्रभाकर शिंदे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. प्रभाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही यादी तयार झालेली असून, हे काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे असेही महापालिकेला सांगितलेले आहे. त्यांनी पालिकेला नालेसफाई झालेत तर याचे काही पुरावे आहेत का, अशीच विचारणा केलेली आहे.
१०७ टक्के नालेसफाई केली असे पालिकेकडून सांगण्यात येत असल्याचा दावा भाजप नगरसेवकांनी हाणून पाडलेला आहे. सर्वसामान्य मुंबईकरांना पावसाच्या दिवसांत वेठीस धरण्याच्या महापालिकेच्या कामावरही टीका करण्यात आली. मुंबईतील अनेक भागांमध्ये पाऊस कमी झाला तरी आठ ते दहा तास पाणी ओसरले नव्हते. याआधीही भाजप कडून ईशान्य मुंबई तसेच पूर्व उपनगरातील नाल्यांची पाहणी करून नालेसफाईच्या कामाचा पर्दाफाश करण्यात आला होता.