भाजपा अध्यक्ष नड्डा आरती करताना मोठी दुर्घटना टळली !

पुण्यातील साने गुरूजी तरूण मंडळाच्या देखाव्याच्या कळसाला लागली आग

भाजपा अध्यक्ष नड्डा आरती करताना मोठी दुर्घटना टळली !

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा पुणे दौऱ्यावर असताना एक मोठी दुर्घटना टळली. पुण्यातील साने गुरुजी तरुण मंडळात बाप्पाची आरती करण्यासाठी जे.पी.नड्डा दाखल झाले होते. मात्र त्याचवेळी गणेश मंडळाने साकारलेल्या महाकाल मंदिराच्या देखाव्याला आग लागल्याची घटना घडली.अचानक देखाव्याच्या कळसाला आग लागल्याने जे.पी.नड्डा याना आरती अर्धवट सोडून बाहेर जावे लागले.दरम्यान पाऊस सुरु असल्याने लागलेली आग लवकर विझली.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे त्यांच्या ऐतिहासिक गणेश उत्सव दौऱ्यासाठी २५ सप्टेंबर रोजी मुंबईमध्ये दाखल झाले होते.नड्डा यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेत इतर गणेश मंडळांची भेट घेत गणेशाचे दर्शन घेतले.त्यानंतर नड्डा हे पुणे दौऱ्यावर आले असता त्यांनी पुण्यातील त्यांनी अनेक गणेश मंडळांना भेटी दिल्या.यागणेश मंडळाच्या भेटी दरम्यान एका मंडळाच्या देखाव्याला आग लागल्याची घटना काल घडली.पुण्यातील साने गुरूजी तरूण मंडळाच्या देखाव्याच्या कळसाला आग लागली.

हे ही वाचा:

एनआयएकडून खलिस्तानी- गँगस्टर्स विरोधात कारवाईचा बडगा

नाझी सैनिकाचा गौरव; कॅनडाच्या लोकसभा अध्यक्षाचा राजीनामा

इराकमध्ये लग्नसोहळ्यात लागलेल्या आगीत १०० ठार

गरवारे क्लब निवडणुकीत शरद पवारांना मोठा धक्का

जेव्हा आग लागली तेव्हा जे. पी. नड्डा हे मंडपात गणेशाची आरती करत होते. साने गुरूजी तरुण मंडळाने यावर्षी महाकाल मंदिराचा देखावा केला होता.या देखाव्याच्या कळसाला आग लागली.अचानक आग लागल्याने सुरक्षिततेच्या कारणाने सुरक्षा रक्षकांनी जे. पी. नड्डा यांना तात्काळ बाहेर काढलं.त्यामुळे नड्डा याना गणेशाची आरती अर्ध्यावरच सोडून बाहेर जावे लागले.दरम्यान, पाऊस सुरू असल्याने आग लवकर विझली आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही.मात्र, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Exit mobile version