भारतीय जनता पक्षाचे नेते गौरव भाटिया यांनी रॉबर्ट वड्रा आणि गांधी कुटुंबावर जोरदार निशाणा साधला आहे. गौरव भाटिया यांनी त्यांचे वर्णन वंशपरंपरागत भ्रष्ट कुटुंब असे केले. हरियाणातील जमीन व्यवहार प्रकरणी ईडी रॉबर्ट वाड्रा यांची चौकशी करत आहे. या मुद्द्यावरून गौरव भाटिया यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. माध्यमांशी बोलताना भाटिया यांनी त्यांच्यावर शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करण्यात सहभागी असलेले भू-माफिया असल्याचा आरोप केला. तसेच त्यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे नॅशनल हेराल्ड घोटाळ्यात, माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी हे व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळ्यात आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी हे बोफोर्स घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप केला.
ते म्हणाले, या कुटुंबाने भारताची आणि शेतकऱ्यांच्या जमिनी लुटण्याची शपथ घेतली का?. कोणीही यांना प्रश्न विचारू नयेत, असे त्यांना वाटते. गौरव भाटिया यांनी हल्लाबोल केला आणि म्हणाले, त्यांच्या आणि काँग्रेसच्या दृष्टीने रॉबर्ट वाड्रा हे एक सार्वजनिक नेते आहेत. पण जनतेच्या नजरेत ते एक भू-माफिया आणि भ्रष्ट व्यक्ती आहेत, हेच वास्तव आहे.
हे ही वाचा :
“सुपर ओव्हरचा सुपरस्टार – मिशेल स्टार्क!”
पुढील सुनावणीपर्यंत वक्फ बोर्ड किंवा कौन्सिलमध्ये नियुक्त्या नकोत!
बंगालमध्ये प्रशासन यंत्रणा कोसळली
वक्फ कायद्यामुळे मुस्लिम समाजाचा विकास
दरम्यान, हरियाणा जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने आज (१७ एप्रिल) पुन्हा प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांना चौकशीसाठी बोलावले होते. चौकशीचा आजचा त्यांचा तिसरा दिवस होता. भूमी व्यवहार प्रकरणात ईडीसमोर चौकशीसाठी हजर होताना रॉबर्ट वाड्रा यांनी माध्यमांशी संवाद साधताना केंद्र सरकारवर सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप केला. याच दरम्यान, नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने राऊस अव्हेन्यू कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात सोनिया गांधी, राहुल गांधी, इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोदा, सुमन दुबेसह इतरांची नावे आहेत.