राज्यातील महिलांचे प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा करून त्यांना न्याय मिळवून देणाऱ्या भाजप नेत्या चित्र वाघ यांच्यावर पक्षाने मोठी जबादारी सोपवली आहे. चित्रा वाघ यांची भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. बावनकुळे यांनी गुरुवारी चितर वाघ यांना निवडीचे पात्र दिले आहे. पंकजा मुंडे यांना डावलून भाजपने चित्रा वाघ यांच्यावर पुन्हा एकदा एवढी मोठी जबाबदारी टाकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
भाजपच्या महिला मोर्चाच्या विद्यमान अध्यक्ष उमा खापरे विधानसभेत आमदार म्हणून निवडून गेल्यामुळे त्यांच्या जागी चित्र ताई वाघ यांची निवड करण्यात आली आहे. येणाऱ्या दिवसांत मी पूर्ण ताकदीने काम करीन अशी प्रतिक्रिया चित्र वाघ यांनी निवड झाल्यानंतर दिली आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचे बक्षीस म्हणून चित्रा वाघ यांना हे पद देण्यात आल्याचे समजते. महिलांच्या सक्षमीकारणासाठी महिलांचे सगळे विषयांच्या ठिकाणी चित्र ताई पोहचतात. महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका करायची असो, त्यांना उत्तर देण्यासाठी चित्रा वाघ नेहमीच पुढे असतात. यासोबतच राज्यातील महिलांचे प्रश्न अत्यंत आक्रमकपणे मांडण्यात त्या अग्रेसर आहेत. त्यामुळेच पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवली असल्याचे बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.
हे ही वाचा:
संभाजी भिडेंनी पत्रकाराला सांगितले, आधी टिकली लाव मगचं बोलू
मुंबईत एका मुलीचे फुटपाथवरून अपहरण, दोन महिला अटकेत
राज्यातील बँकिंग घोटाळ्यांची होणार चौकशी
भारताने बांगलादेशला नमवले आणि पाकिस्तानची केली कोंडी
तीन वर्षांत तुम्ही मला काम करताना बघितलं आहे. सोमवारपासून माझा दौरा सुरू होणार आहे. पहिला दौरा सिंदखेडराजा येथून सुरू होणार आहे. आज मला पक्षाने संधी दिली. मी तुमच्यापेक्षा काही वेगळी नाही. आता आपल्या सर्वांना एकत्रितपणे काम करायचे आहे. येणाऱ्या दिवसांत मी पूर्ण ताकदीने काम करीन अशा भावना चित्राताई वाघ यांनी यावेळी व्यक्त केल्या.