शनिवारी मुंबईत झालेल्या पावसाच्या थैमानात चेंबूर, विक्रोळी आणि भांडुप भागात भिंत कोसळून जीवित हानी झाली. या दुर्घटनेत आत्तापर्यंत २४ जणांनी जीव गमावल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत काही मुलांनी आपल्या पालकांचे छत्र गमावले असून अशा सर्व मुलांच्या शिक्षणाचा खर्च भारतीय जनता पार्टी उचलणार आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ही घोषणा केली आहे.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी रविवारी भांडुप विक्रोळी आणि चेंबूर यातील हे ठिकाणच्या दुर्घटनाग्रस्त भागाला भेट दिली यावेळी त्यांनी नुकसानाची पाहणी केली असून तेथील नागरिकांना भेटतात त्यांच्या व्यथा समजून घेतल्या. विक्रोळी येथील दुर्घटनेत काही मुलांचे छत्र हरवले. या मुलांची शिक्षणाची सर्व जबाबदारी भाजपाने स्विकारली आहे. या मुलांच्या शिक्षणाचा खर्च भाजपा करणार असल्याचे दरेकर यांनी घोषित केले आहे. तर यावेळी माध्यमांची चर्चा करताना दरेकर यांनी ठाकरे सरकारवरही निशाणा साधला आहे.
विक्रोळीमध्ये निकृष्ट दर्जाची संरक्षण भिंत होती, त्यामुळे पावसात घरं पडून निष्पाप नागरिकांचा हकनाक बळी गेला! ही जबाबदारी कोणाची आहे? @OfficeofUT महोदय?
केवळ नोटिसा चिटकवून भागणार नाही, @mybmc चे याकडे किती लक्ष आहे? हे यावरून दिसून येते. pic.twitter.com/1i81Lkpex0— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) July 18, 2021
नुसत्या नोटिसी लावल्या म्हणजे जबाबदारी संपली का?
“हा असा पाऊस मुंबईत पहिल्यांदा आला आहे का? काही दिवसांपूर्वी मोठा पाऊस येऊन आपल्याला इशारा दिला होता. मिठी नदीची धोक्याची पातळी कायमच ओलांडली जाते. धोक्याची पातळी वाढते हे दरवर्षी अपेक्षित असते. काही गोष्टी आपल्याला माहित आहेत, संभाव्य आहेत तर मोठ्या प्रमाणावर नियोजन करायचे सोडून, आपत्ती आल्यावर हात वर करायचे आणि पाऊस मोठ्या प्रमाणावर पडला त्याला आम्ही काय करू? अशा प्रकारे आपल्याला जबाबदारी झटकता येणार नाही.” असा घणाघात दरेकर यांनी केला आहे.
“महापौर म्हणतात नोटीस पाठवल्या. पण फक्त नोटीस पाठवल्या म्हणजे जबाबदारी संपली का? नोटीस मिळूनही लोक तिथे राहतात. जीव मुठीत धरून राहतात. कारण जागा सोडली तर घर जाईल अशी भिती त्यांना असते. त्यामुळे जबाबदारी सरकारची आहे. फक्त नोटीस चिकटवून जबाबदारीपासून हात झटकत येणार नाही. हे सरकारचे अपयश आहे” असे दरेकर म्हणाले.
📍विक्रोळी
पावसाला दोष देऊन, तुम्हाला जबाबदारी झटकता येणार नाही! : मा. @mipravindarekar pic.twitter.com/2RqSSl2jAR— OfficeOfPravinDarekar (@officeofPD) July 18, 2021