‘ईश्वर-अल्ला तेरो नाम’ भजनावरून भाजपाचा संताप, गायिकेला मागावी लागली माफी!

कार्यकर्त्यांनी कार्यक्रमात घातला गोंधळ

‘ईश्वर-अल्ला तेरो नाम’ भजनावरून भाजपाचा संताप, गायिकेला मागावी लागली माफी!

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची १०० वी जयंती २५ डिसेंबर रोजी राजधानी पाटणा येथील बापू सभागृहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रसिद्ध भोजपुरी गायिका देवी यांचा परफॉर्मन्स होता. गायिका देवी यांनी यावेळी रघुपती राघव राजा राम हे गाणे गायला सुरुवात केली. देवी यांनी या गाण्यात ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम’ ही ओळ गाताच भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी विरोध करत कार्यक्रमात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हे गाणे स्टेजवर गाऊ नये, असे भाजप कार्यकर्त्यांनी सांगितले.

कार्यक्रमादरम्यान झालेल्या गदारोळानंतर माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अश्वनी चौबे आणि त्यांचे पुत्र शाश्वत चौबे यांनी पुढाकार घेवून कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. यानंतर गायिका देवी यांनी मंचावरून माफी मागितली. गायिका म्हणाली, आम्ही हे गाणे कोणालाही त्रास देण्यासाठी गायले नाही. कोणी दुखावले गेले असेल तर त्याबद्दल आम्ही माफी मागत मागतो.

अटलबिहारी वाजपेयींच्या जन्मशताब्दी सोहळ्याच्या कार्यक्रमात या गाण्याचा समावेश नसावा, असे भाजप कार्यकर्त्यांचे मत होते. कार्यक्रमा दरम्यान काही वेळ गोंधळाचे वातावरण होते. दरम्यान, या प्रकरणावरून बिहारमध्ये राजकारण केले जात आहे. विरोधकांकडून भाजपाला लक्ष्य केले जात आहे.

हे ही वाचा : 

अमित शाहांच्या निधनाची खोटी पोस्ट करणाऱ्याला ठोकल्या बेड्या

शक्य असतं तर विशाल गवळीचा चौरंगच केला असता!

वीर बाल दिनी १७ शूर मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार

इस्लाम स्वीकारण्याचा सल्ला देणाऱ्याला अभिनेत्री पवित्रा पुनियाने सुनावले

Exit mobile version