मथुरेच्या खासदार हेमा मालिनी यांच्या विरोधात अश्लील टिप्पणी केल्याबद्दल भाजपने काँग्रेस खासदार रणदीप सुरजेवाला यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. कॉंग्रेस पक्ष हा नेहमी महिलांचा तिरस्कार करणारा पक्ष असल्याचे भाजपने म्हटले आहे. दरम्यान हरियाणाच्या महिला समितीने सुरजेवाल यांच्या या वक्तव्यावर ९ एप्रिल रोजी समन्स बजावले होते. या संदर्भात भाजपच्या आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय एक्सवर एका व्हिडीओ प्रसारित केला त्यामध्ये सुरजेवाल यांनी हेमा मालिनी यांच्या बद्दल अश्लील वक्तव्य केल्याचे दिसून येते.
या संधर्भात मालवीय यांनी ट्विट केले की, हेमा मालिनी एक कर्तबगार व्यक्ती आहेत. त्यांच्या बद्दल केलेली टिपण्णी म्हणजे सर्वसामान्य महिलांचा अपमान आहे. ते पुढे म्हणाले की, ही राहुल गांधी यांची कॉंग्रेस आहे. या कॉंग्रेसचा हा घाणेरडा चेहरा असून कायम महिलांचा तिरस्कार कॉंग्रेसकडून केला जात आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सुद्धा सुरजेवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांना लोकसभा निवडणुकीत महिला चांगला धडा शिकवतील असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.जेव्हा विरोधक हेमा मालिनी यांच्या विरोधात एकही उमेदवार शोधू शकत नाही त्यामुळे त्यांच्या विरोधात अशी अपमानास्पद भाषा विरोधकांकडून वापरली जात आहे.
हेही वाचा..
महंत अनिकेतशास्त्री महाराज यांच्यावर मुस्लीम समुदायाकडून हल्ला
काँग्रेसचा ‘हात’ सोडणाऱ्या गौरव वल्लभ यांचा भाजपात प्रवेश
आयएएस पदाचा परमपाल कौर सिद्धू यांचा राजीनामा, भाजपात जाण्याची शक्यता!
सिद्धू मुसेवालाचे वडील लोकसभा निवडणूक लढविण्याच्या तयारीत!
भाजपचे प्रवक्ते शेहजाद पूनावाला म्हणाले की, काँग्रेसची एकमेव ओळख म्हणजे नारी शक्तीचा अनादर करणे असा आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाटे यांनी कथितपणे पोस्ट केलेल्या भाजप नेत्या कंगना रणौत यांच्या विरोधात अपमानास्पद टिप्पणीबद्दल अलीकडील वादाचा संदर्भ त्यांनी यानिमिताने दिला आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी येथील भाजपच्या लोकसभा उमेदवार राणौत यांच्या विरोधात पोस्ट नंतर हटविण्यात आली होती.