मुंबई : चौकटीबाहेरचा विचार करणारे लोकप्रतिनिधी म्हणून ओळख असलेल्या भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी आज त्यांच्या वाढदिवशी आदीवासी पाड्यातील शंभर मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजनेची खाती उघडून दिली. या निधीचा त्या मुलींच्या शिक्षण, विवाहासाठी उपयोग होणार आहे.
कांदिवली पूर्व विधानसभेचे आमदार अतुल भातखळकर यांची सासूरवाडी वाडा येथे आहे. या भागातील आदीवासी पाड्यांसाठी ते नेहमीच सक्रीय असतात.
‘महिला दिन’ वेगळ्या पद्धतीने साजरा केला आहे. ग्रामीण भागातील आर्थिक दुर्बल घटकातील तब्बल १०० विद्यार्थीनींची केंद्र सरकारच्या ‘सुकन्या समृद्धी’ योजनेची खाती काढून त्याचा पहिला हफ्ताही भरला आहे.
हेही वाचा :
विधानसभेत आज होणार ‘महिला लक्षवेधी’
अभिमानास्पद… भारतीय वंशाचे वकील अरुण सुब्रमण्यम दक्षिण आशियाचे पहिले न्यायाधीश
वाडा परिसरातील कंचाड, कुमडल, रायसल, म्हस्रोली आदी आदिवासी पाड्यात राहणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकातील सुमारे १०० विद्यार्थीनींची पोस्टामार्फत सुकन्या समृद्धी योजनेची खाती काढण्यात आली आहेत. नवजात ते १० वर्षे वयोगटातील मुलींसाठी ही केंद्र सरकारची योजना असून मुलींना सज्ञान झाल्यानंतर त्यांच्या उच्च शिक्षणासाठी, लग्नासाठी ही रक्कम मिळते. या योजनेची माहिती ग्रामीण भागात व्हावी, ग्रामस्थांना बचतीची सवय लागावी तसेच या गरीब कुटुंबातील मुली जेव्हा सज्ञान होतील, तेव्हा त्यांच्या हाती काही तरी विशिष्ट रक्कम यावी, या योजनेचा उद्देश.
भातखळकर यांनी ही महीला दिनाचे आणि वाढदिवसाचे औचित्य साधून ही योजना शंभर कन्यांरत्नांपर्यंत पोहोचवली. सुकन्या समृद्धी योजनेची एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर खाती उघडण्याची कदाचित ही या भागातील पहिलीच वेळ असेल. या उपक्रमाबद्दल आपल्या जावयाचे गावकऱ्यांनी चांगलेच कौतुक केले आहे.